पुण्यात ‘नीट’च्या निकालानंतर 2 जणांच्या आत्महत्या:नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज
‘नीट’ परीक्षेचा निकाल गुरुवारी सायंकाळी जाहीर झाला. या निकालानंतर पुण्याच्या हडपसर भागातील महंमदवाडीत एका १८ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. अनुष्का चौगुले (रा. सॅफ्रॉन हिल सोसायटी, महंमदवाडी) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव असून, या प्रकरणी काळेपडळ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आई घरातील कामात व्यग्र…