Headlines

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:20 हजार उधारी फेडण्यासाठी हॅकिंगचे ट्रेनिंग देऊन काढली 25 हजार खोटी जन्म प्रमाणपत्रे

अवघ्या २० हजार रुपयांच्या उधारीपायी महाराष्ट्रात तब्बल २५ हजार बोगस नागरिकांचा जन्म झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पैसे परत देता येत नसल्याने एका मास्टरमाइंडने आपल्या मित्राला थेट राज्य शासनाचे सीआरएस (सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम) पोर्टल हॅक करण्याचे प्रशिक्षण दिले. ठाणे, यवतमाळ, जळगाव व छत्रपती संभाजीनगर या ४ जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींचे पोर्टल हॅक करून सुमारे २५ हजार…

Read More

10, 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा पुढील वर्षी येऊ शकतात:पॉलिमर शीट कंपन्या निविदा स्पर्धेत, 18 ऑगस्टला टेंडर

देशात पुढील वर्षापासून प्लास्टिकच्या नोटा चलनात येऊ शकतात. याची सुरुवात १० आणि २० रुपयांच्या छोट्या नोटांपासून होईल. भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रणालयाच्या बेंगळुरू युनिटने ओपेसिफाइड पॉलिमर सबस्ट्रेट शीट्सच्या पुरवठ्यासाठी जगभरातील कंपन्यांकडून निविदा मागवल्या आहेत. हे टेंडर १८ ऑगस्ट रोजी उघडेल. देशात प्लास्टिक नोटांची शीट तयार करणाऱ्या कंपन्या नाहीत. नुकतेच आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले…

Read More

मराठा विद्यार्थ्यांना ओबीसी प्रमाणे शैक्षणिक सवलती!:उच्च शिक्षण संचालनालयाचे सर्व कॉलेजला आदेश

राज्य सरकारने मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ओबीसीप्रमाणे सर्व शैक्षणिक सवलती देण्याचा निर्णय घेतला आहे. हा लाभ शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून लागू होणार असून त्याच्या अंमलबजावणीचे आदेश सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांना देण्यात आले आहेत. महाडीबीटी पोर्टलवर आवश्यक तांत्रिक बदल केले जाणार असून १६ प्रकारच्या शैक्षणिक लाभांसह व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शुल्क आणि कॅपनंतरच्या प्रवेशांनाही सवलती मिळणार आहेत. यातून उच्च…

Read More

संभाजीनगरमधील शेंद्रा-बिडकीन-ढोरेगाव ग्रीनफील्ड रस्त्यासाठी १० दिवसांत निविदा:महामार्ग थेट एमआयडीसीला जोडला जाणार असल्याने प्रवासाचा दीड तास वाचणार

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पायाभूत सुविधांना गती देणाऱ्या शेंद्रा-बिडकीन ते ढोरेगाव या सुमारे ६७.८० किलोमीटरच्या नव्या ग्रीनफील्ड रस्ते प्रकल्पाचे राजपत्र प्रसिद्ध झाले. सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गाला ‘राज्य महामार्ग क्रमांक ६१३’ म्हणून अधिसूचित केले. येत्या १० दिवसांत या प्रकल्पाची निविदा प्रसिद्ध होईल. या रस्त्याचे काम १०० टक्के पूर्ण झाल्यावर छत्रपती संभाजीनगरसह मराठवाडा, खान्देशातील प्रवाशांची ढोरेगावमार्गे पुण्याला…

Read More

Mata Hari Execution Story: Spy Executed By Firing Squad

इंद्रभूषण मिश्र6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक ननचा गळा दाटून आला होता, आवाज अडकत होता. ती जड अंतःकरणाने म्हणाली- ‘तुमची दया याचिका फेटाळली गेली आहे… डेथ वॉरंट जारी झाले आहे. आज… याच वेळी मृत्युदंडाची शिक्षा निश्चित करण्यात आली आहे.’ महिलेच्या चेहऱ्यावर कोणतीही चिंता नव्हती. ती आरामात उठली आणि पलंगावर बसली. तिने विचारले, ‘मला थेट घेऊन जाल का?’…

Read More

मुख्यमंत्री फडणवीसांशी 4 नेत्यांच्या भेटीने संशयाच्या ‘गाठी’:पाटील, तटकरे, पटेलांपाठोपाठ पार्थही भेटले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत गेल्या दोन दिवसांत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवारांच्या रात्री उशिरा भेटीगाठी झाल्या. त्यामुळे संशयाच्या गाठी निर्माण झाल्या आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिपदासाठी प्रफुल्ल पटेलांचा प्रयत्न हाणून पाडत मंत्रिपदासाठी खासदार पार्थ पवार लाॅबिंग करत आहेत. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांची गुरुवारी रात्री उशिरा भेट घेतली. त्यामुळे पटेल नाराज…

Read More

सावधान ! शुभमंगलांना सिंहस्थात 3 महिने विराम:सिंहस्थ पर्वाची सुरुवात होताच नेहमीच्या मुहूर्तांना लागणार ब्रेक

३१ ऑक्टोबर २०२६ रोजी गुरूचा सिंह राशीत प्रवेश होताच नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थ पर्वाला प्रारंभ होणार आहे. या दिवसापासून ते २४ जानेवारी २०२७ पर्यंत विवाहासह बहुतांश मंगल कार्यांसाठी नियमित शुभमुहूर्त नसल्याने राज्यभरातील हजारो विवाह पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे. परिणामी विवाह हॉल, केटरर्स, डेकोरेशन, बँड, फोटोग्राफी आणि इतर विवाहाशी संबंधित व्यवसायांवरही या कालावधीचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त…

Read More

‘एसआयआर’मुळे राज्यातील किमान 1 कोटी मतदारांची नावे कमी होणार:कोणत्या त्रुटींमुळे मतदार यादीतून नाव कापले जाईल, पाहा मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची मुलाखत

राज्यात विशेष मतदार यादी पडताळणी मोहीम (एसआयआर) सुरू आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी ९ कोटी ७८ लाख ५४ हजार ४९ मतदार होते. त्यांच्यासाठी हाती घेण्यात आलेल्या या अत्यंत महत्त्वाच्या मोहिमेत मतदारांसह सरकारी यंत्रणेचाही निरुत्साह दिसून येत आहे. छत्रपती संभाजीनगरात ६४ टक्के मतदारांची पडताळणी रखडली आहे. अशीच परिस्थिती विविध जिल्ह्यांत आहे. राज्य निवडणूक आयोगातील सूत्रांनी सांगितले…

Read More

Ketan Agarwal Murder Case Pune; Real Life Crime Behind Social Media

“माझ्या हृदयाला घर मिळाले…” साखरपुड्यानंतर सोशल मीडियावर आपल्या होणाऱ्या नवऱ्यासोबतचा रोमँटिक डान्सचा व्हिडिओ शेअर करताना दिलेले हे कॅप्शन. हसरे चेहरे, प्री-वेडिंग शूटची स्वप्ने आणि एक ‘परफेक्ट कपल’ असल्याचा सार्वजनिक देखावा. पण याच आभासी जगाच्या प . पुण्यातील तरुण उद्योजक केतन अग्रवाल याच्या लोहगडावरील कथित हत्याकांडाला (18 जून) एक महिना पूर्ण होत आहे. हे प्रकरण केवळ…

Read More

आंध्र प्रदेशमध्ये कोरोनाचे 12 रुग्ण, 4 मृत्यू:जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पुण्याला पाठवले नमुने, शेजारील राज्य कर्नाटक सतर्कतेवर

आंध्र प्रदेशमध्ये २६ जून ते १६ जुलै दरम्यान कोरोना संसर्गाची १२ प्रकरणे समोर आली आहेत. या काळात ४ रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. राज्य सरकारने विषाणूच्या प्रकाराचा (व्हेरियंट) शोध घेण्यासाठी ५ नमुने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV), पुणे येथे पाठवले आहेत. तिकडे शेजारील राज्य कर्नाटकातही खबरदारी वाढवण्यात आली आहे. आंध्र प्रदेशचे आरोग्य सचिव आणि आयुक्त वीरा…

Read More