देहूतून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज प्रस्थान:मुसळधार पावसातही भक्तिमय वातावरण, नव्या चांदीच्या रथातून पादुकांचा सोहळा
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याला आज देहूतून उत्साहात प्रारंभ होत आहे. मुसळधार पावसामुळे आणि इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे प्रशासनाने काही निर्बंध लागू केले असले, तरी वारकऱ्यांचा उत्साह कायम असून संपूर्ण देहूनगरी “ज्ञानोबा-तुकोबा”च्या जयघोषाने दुमदुमून गेली आहे. पुढील 18 दिवसांचा पंढरपूरच्या दिशेने निघणारा हा भक्तिमय प्रवास आज सुरू होत आहे. संत तुकाराम महाराज मंदिर फुलांच्या…