Headlines

दीड किमीचा रस्ता स्वखर्चातून करून पाळले दिलेले वचन:पराभवानंतरही गणेश ढोरमारे यांनी बनवला रस्ता‎

निवडणुकीत विजय-पराभव हा राजकारणाचा भाग असतो, मात्र निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द पराभवानंतरही पाळणे हीच खरी माणुसकी आणि लोकसेवेची ओळख आहे. याचा प्रत्यय भराडी जिल्हा परिषद सर्कलमध्ये आला असून जिल्हा परिषद निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही गणेश ढोरमारे यांनी प्रचारादरम्यान काटोन वस्तीतील शेतकरी बांधवांना दिलेला शब्द पूर्ण केला आहे. ‘निवडणुकीचा निकाल काहीही असो, तुमचा रस्ता करून देणार,’ या एका…

Read More

खंडाळ्यात पावसाचा मोठा खंड; खरिपाची पिके करपू लागली:पाच दिवसांत पाऊस न आल्यास पिके सुकणार; शेतकरी आर्थिक संकटात‎

वैजापूर तालुक्यातील खंडाळा व परिसरातील गावांमध्ये गेल्या २० ते २२ दिवसांपासून पावसाने अचानक मोठा खंड दिल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता, मात्र आता ऐन वाढीच्या आणि फुलोऱ्याच्या अवस्थेत पावसाने पाठ फिरवल्याने पिके माना टाकू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी वाढ झाली आहे. यंदा मान्सून वेळेवर दाखल…

Read More

खरीप पिके वाचवण्यासाठी पिंपळदरी परिसरातील शेतकऱ्यांचे रात्रभर जागरण:शेतकऱ्यांसमोर संकट, वन विभागाने लक्ष देण्याची मागणी‎

पिंपळदरी सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरी आणि लगतच्या संपूर्ण परिसरात सध्या खरीप हंगामातील पिके अतिशय जोमात आली असून शेते हिरवीगार दिसू लागली आहेत. मात्र, पिके ऐन बहरात असतानाच वन्यप्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे बळीराजा कमालीचा हवालदिल झाला आहे. रानडुक्कर, नीलगाय, हरिण व इतर रानटी प्राण्यांचे टोळच्या टोळ रात्रीच्या वेळी शेतात घुसून कपाशी, सोयाबीन, मका, तूर, उडीद आणि मुगाच्या पिकांची…

Read More

Centre Seeks Supreme Court Nod for CSE 2025 Service Allocation

नवी दिल्ली6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक ओबीसी क्रीमी लेयरच्या नियमांबाबत मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे CSE-2025 च्या 958 निवडक उमेदवारांची सेवा वाटप प्रक्रिया जुन्या ओबीसी क्रीमी लेयर निकषांवर आधारित करण्याची परवानगी मागितली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ‘युनियन ऑफ इंडिया विरुद्ध रोहित नाथन’ प्रकरणात 11 मार्च रोजी ओबीसी क्रीमी लेयरच्या ओळखीबाबत निर्णय दिला…

Read More

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लासूरला शांतता समिती बैठक

लासूर स्टेशन आगामी गणेशोत्सव व विविध सणांच्या पार्श्वभूमीवर लासूर स्टेशन येथील जैन मंगल कार्यालयात व्यापारी, पोलिस पाटील, ग्रामस्थ आणि गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त शांतता समिती बैठक पार पडली. गंगापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. निलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबाबत महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या. उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी…

Read More

गेल्या दोन दिवसांमध्ये दीड लाख भाविकांनी घेतले घृष्णेश्वराचे दर्शन:उत्तर भारतातील भाविकांची जास्त संख्या, मंदिर परिसरात महाप्रसाद वाटप‎

वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी तिसऱ्या श्रावण सोमवारीही शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती. रात्रीपासूनच भाविकांची गर्दी वाढली होती, तर दिवसभरात हजारो भाविकांनी श्री घृष्णेश्वराचे दर्शन घेतले आहे. हा तिसरा श्रावण सोमवार . भाविकांनी श्री घृष्णेश्वर दर्शनाबरोबरच लेणी पाहण्याचाही आनंद घेतल्याने लेणी परिसरही भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. पोलिस प्रशासनाच्या वतीने श्री घृष्णेश्वर मंदिरासह…

Read More

Tata Hyundai Car Prices Hike; LPG Subsidy Affected Without e-KYC

8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आज म्हणजेच 1 सप्टेंबर 2026 पासून व्यावसायिक सिलेंडर सरासरी 11.50 रुपयांनी महाग झाला आहे. तर मुंबईत आजपासून दूध 9 रुपये प्रति किलोपर्यंत महाग झाले आहे. याशिवाय, ज्या ग्राहकांनी एलपीजी कनेक्शनची ई-केवायसी पूर्ण केलेली नाही, त्यांना सबसिडीचा लाभ घेताना अडचणी येऊ शकतात. ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट होती. सप्टेंबरमध्ये होणारे 5…

Read More

श्री पिनाकेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी:संभाजीनगर, नाशिक, जळगाव जिल्ह्यांच्या सीमेवर देवस्थान‎

नांदगाव तालुक्यातील जातेगाव पासुन पाच कि.मी.अतरावर उत्तरेस असलेल्या सह्याद्री पर्वत रांगेतील डोंगर आहे. ह्या डोंगराच्या शिखरावर आहे याशिखरावर पिनाकेश्वर महादेवाचे मंदिर असुन येथे आज पवित्र श्रावण महिन्याच्या पहिल्याच सोमवारी निमित्ताने हजारो महिलांसह आबालवृद्धांनी दर्शनाचा लाभ घेतला. ह्या पिनाकेश्वर महदेवाच्या दर्शनासाठी मराठवाडा,मध्यमहाराष् ट्रासह खान्देशातील भाविक मोठ्या संख्येने येत असतात, श्रावण महिन्यातील तिसर्या सोमवारी लाखो भाविक अनवाणी…

Read More

टाकळीत पावसाअभावी शेतकऱ्याने उपटून फेकली उभी मोसंबीची बाग:यंदा पावसाअभावी विहिरी, बोअरवेल आटले, दुष्काळाचे संकट ‎

यंदा पावसाने पाठ फिरवल्याने हतबल झालेल्या एका शेतकऱ्याने आपली दोन एकरातील मोसंबीची बाग जेसीबीने उपटून फेकल्याची घटना समोर आली आहे. खते-औषधांचा वाढता खर्च, कमी बाजारभाव, त्यात पाण्याअभावी झाडे सुकत असल्यामुळे शेतकऱ्याने हे टोकाचे पाऊल उचलले. . पैठण तालुक्यातील टाकळी येथील संतोष सोलाटे या शेतकऱ्याने मोठ्या आशेने मोसंबीची लागवड केली होती. सुरुवातीची दोन- तीन वर्षे चांगले…

Read More

समृद्धीवर वाहनांचे टायर फोडूनलुटणारी टोळी धाराशिवला अटकेत:वळणमार्ग, सीसीटीव्हीच्या कक्षेबाहेरील ठिकाणे शोधून करायचे वाहनचालकांची लूट

समृद्धी महामार्गावर धावत्या वाहनासमोर 26, 27 ऑगस्ट रोजी धारदार लोखंडी वस्तू, जॅक टाकून टायर फोडत प्रवाशांकडील सुमारे 20 लाख रुपये लुटले होते. या प्रकरणात रविवारी रात्री कोम्बिंग ऑपरेशन राबवून धाराशिव येथे 7 जणांच्या टोळीला अटक करण्यात आली. सोमवारी त्यांना नाशिक पोलिसांच्या ताब्यात दिले. कोर्टाने त्यांना आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. धाराशिव जिल्ह्यातील कळंब व वाशी…

Read More