संविधान समता दिंडीत सहभागी व्हा; वारकरी संप्रदायतर्फे आवाहन:सामाजिक संस्था संघटनांतर्फे भक्ती संगम कार्यक्रम उत्साहात
प्रतिनिधी |अकोला संविधानाची स्वातंत्र्य, समता,बंधुता आणि न्याय ही मूल्ये वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून जनसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी संविधान समता दिंडी काढली जाते. या दिंडीत सहभागी होण्याचे आवाहन संविधान समता दिंडीचे मुख्य संवादक हभप शामसुंदर सोन्नर महाराज यांनी केले. ते वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज निसर्गोपचार संस्था रणपिसे नगर अकोला येथे आयोजित भक्ती संगम कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रम सामाजिक संस्था…