व्हॅलेंटिना मेगाकॉर्पच्या बँक खात्यांवर अंतरिम जप्ती:भरघोस परताव्याचे आमिष दाखवून ठेवी स्वीकारल्याप्रकरणी पुणे पोलिसांची कारवाई
पुणे पोलिसांनी व्हॅलेंटिना मेगाकॉर्प एलएलपी आणि तिच्याशी संबंधित संस्थांच्या बँक खात्यांवर अंतरिम जप्तीची कारवाई केली आहे. गुंतवणूकदारांना भरघोस परताव्याचे आमिष दाखवून अनियंत्रित ठेवी स्वीकारल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी अनियंत्रित ठेव योजना प्रतिबंध अधिनियम २०१९ च्या तरतुदींनुसार याबाबत आदेश काढले आहेत. यामुळे संबंधित खात्यांतील रक्कम काढणे, हस्तांतरित करणे किंवा अन्य आर्थिक…