Headlines

पाच वर्षीय चिमुकलीच्या डोळ्यात पेन्सिल घुसली:घाटी रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया, दृष्टी वाचवण्यात यश

एका पाच वर्षीय मुलीच्या डोळ्यात खेळताना पेन्सिल घुसली. या घटनेत चिमुरडी गंभीर जखमी झाली होती. या पाच वर्षीय चिमुकलीची दृष्टी वाचवण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथील डॉक्टरांना यश आले आहे. नेत्रशल्य चिकित्सा शास्त्र विभागाने यशस्वी शस्त्रक्रिया करून चिमुकलीला नवजीवन दिले. सुरुवातीला या चिमुकलीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, शस्त्रक्रियेची गुंतागुंत आणि…

Read More

अमरावतीच्या विकासावर अजितदादांचे प्रतिबिंब- संजय खोडके:जनसेवा सप्ताहात २५०० दाखल्यांचे वितरण, विविध योजनांचा लाभ

अमरावती शहराच्या विकासावर लोकनेते अजितदादा पवार यांच्या कार्याचे प्रतिबिंब उमटले आहे, असे प्रतिपादन आमदार संजय खोडके यांनी केले. जनसेवा सप्ताहांतर्गत आयोजित महाराजस्व अभियान व समाधान शिबिरात त्यांनी हे मत व्यक्त केले. या शिबिरात सुमारे २५०० विविध दाखल्यांचे वितरण करण्यात आले, ज्यामुळे नागरिकांना अनेक योजनांचा लाभ घेता आला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि दिवंगत…

Read More

कवी शिवा इंगोले यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन:डॉ. अनिल सकपाळ म्हणाले- भारतीय तत्त्वज्ञानाचा संघर्ष समजून घ्या

ज्येष्ठ कवी व साहित्यिक शिवा इंगोले यांच्या “अक्षराचा तिसरा डोळा” या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मुंबईत पार पडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रायटर्स असोसिएशनच्या वतीने साहित्यिक बाबुराव बागुल यांच्या जयंतीनिमित्त दादर येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सुरेंद्र गावस्कर सभागृहात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना ज्येष्ठ विचारवंत डॉ. अनिल सकपाळ यांनी सांगितले की, “कवी हा संस्कृतीला प्रश्न…

Read More

महात्मा फुले हायस्कूल व प्राथमिक विभागातर्फे पालखी सोहळा उत्साहात संपन्न:वारकऱ्यांच्या वेशभूषेत सहभागी झाली विद्यार्थी

25/07/ 2026 शनिवार रोजी देवशयनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने महात्मा फुले हायस्कूल व प्राथमिक शाळेतर्फे पारंपरिक पालखी सोहळ्याचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल वानखेडे, तसेच प्राथमिकचे मुख्याध्यापक अफसर शेख यांनी पालखीचे पूजन करून पालखी सोहळ्याची सुरुवात केली. मालती वाल्हे यांनी वारीची वैशिष्ट्ये सांगितली. या कार्यक्रमात विद्यार्थी व विद्यार्थिनींनी वारकऱ्यांच्या वेशभूषेत सहभागी होत भक्तिमय…

Read More

सर्वोच्च न्यायालयाने सरकारची याचिका फेटाळली:२८ प्राध्यापकांना जुनी पेन्शन मिळण्याचा मार्ग मोकळा

ज्या प्राध्यापकांची नियुक्ती प्रक्रिया १ नोव्हेंबर २००५ पूर्वी सुरू झाली होती, परंतु त्यांची प्रत्यक्ष नियुक्ती या तारखेनंतर झाली, अशा २८ प्राध्यापकांना आता जुनी पेन्शन योजना लागू होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनाची विशेष अनुमती याचिका फेटाळून लावत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय कायम ठेवला आहे. यामुळे संबंधित प्राध्यापकांना जुनी पेन्शन मिळण्याचा मार्ग सुकर झाला…

Read More

SIR मुळे प्रशासनाची धावपळ:अमरावती जिल्ह्यातील 9 लाख मतदारांची नावे वगळण्याची भीती

अमरावती जिल्ह्यात मतदार यादीच्या एसआयआर कार्यक्रमांतर्गत २५ लाख मतदारांपैकी आतापर्यंत केवळ १६ लाख नागरिकांनीच गणना फॉर्म भरले आहेत. यामुळे ९ लाख नागरिक अजूनही या प्रक्रियेपासून दूर आहेत. वेळेत फॉर्म न भरल्यास त्यांची नावे मतदार यादीतून कमी होण्याची भीती असल्याने प्रशासनाची मोठी धावपळ सुरू आहे. भारत निवडणूक आयोगामार्फत जून महिन्यापासून मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम राबवण्यात…

Read More

शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर चांदूरमध्ये जल्लोष:कॉकरोच जनता पार्टीने फटाके फोडून घोषणाबाजी केली

चांदूर रेल्वे येथे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर कॉकरोच जनता पार्टीने जल्लोष साजरा केला. शहरातील जुन्या मोटार स्टँड परिसरात कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी “असा कसा देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही…” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. कार्यकर्त्यांनी भारतीय संविधानाची प्रत हातात घेऊन संविधान आणि लोकशाही मार्गाने लढा देण्याचा संदेश दिला. या…

Read More

गुजरात विकासाचे प्रारूप देशपातळीवर सिद्ध:मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांचे प्रतिपादन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सब का साथ, सबका विकास’ या मूलमंत्रावर आधारित गुजरात विकासाचे प्रारूप देशपातळीवर सिद्ध केले आहे, असे प्रतिपादन गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांनी केले. दि पूना गुजराथी केळवणी मंडळाच्या शताब्दी सांगता समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी…

Read More

दिल्ली लाठीचार्ज निषेधार्थ दर्यापुरात विरोधकांचा रास्ता रोको:भाजप सरकारविरोधात सर्वपक्षीय पदाधिकारी, शेतकरी, विद्यार्थ्यांचा सहभाग

दर्यापूर येथे केंद्रातील भाजप सरकारविरोधात सर्वपक्षीय पदाधिकारी, संयुक्त किसान मोर्चा आणि भारतीय विद्यार्थी मोर्चाने रास्ता रोको आंदोलन केले. दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट), भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या प्रमुख राजकीय पक्षांचे…

Read More

अभिजीत दीपके म्हणाले- CJP ची पुढील रणनीती लवकरच सांगू:कालच आंदोलन संपले, थोडा वेळ द्या; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यावर चर्चा सुरू

कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दीपके म्हणाले- “पुढील रणनीती लवकरच जाहीर करू. पेपरफुटीविरोधातील आंदोलन कालच संपले आहे. कृपया आम्हाला थोडा वेळ द्या.” न्यूज एजन्सी ANI नुसार, जेव्हा त्यांना पंजाबमधील पेपरफुटीबाबत त्यांची रणनीती काय असेल असे विचारण्यात आले, तेव्हा दीपके यांनी उत्तर दिले की, त्यावरही चर्चा करू. आम्ही सध्या यासाठी नियोजन करत आहोत. सरकारसोबतच्या…

Read More