Headlines

महावितरणच्या नाट्यस्पर्धेतून वीज कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव:‘वारी’ आणि ‘मिना’ने पहिल्याच दिवशी रंगत वाढवली

दिवसभर वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी धावपळ करणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना आपल्या कलागुणांना सादर करण्यासाठी नाट्यस्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठ मिळाले आहे. छत्रपती संभाजीनगर येथील तापडिया नाट्यमंदिरात महावितरणच्या प्रादेशिक आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेला गुरुवारी (१ ऑक्टोबर) सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी जळगाव आणि नांदेड परिमंडलाच्या कलाकारांनी सादर केलेल्या ‘वारी’ आणि ‘मिना’ या नाटकांना प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक…

Read More

राजधानी एक्स्प्रेसमध्ये 1.05 कोटींचे ड्रग्ज जप्त:गोंदियात बिबट्याचे कातडेही पकडले; डीआरआयच्या 3 दिवसांतील 2 कारवायात महिला तस्करासह दोघे ताब्यात

डीआरआयच्या नागपूर युनिटने तीन दिवसांत दोन कारवाया केल्या. यात आंतरराज्यीय अंमली पदार्थ आणि वन्यजीव तस्करी उघडकीस आणली. २७ सप्टेंबर रोजी राजधानी एक्स्प्रेसमधून १.३१२ किलो ॲम्फेटॅमिन जप्त केले. याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत ₹१.०५ कोटी आहे. एका भारतीय महिला प्रवाशाच्या सुटकेसमधील गुप्त कप्प्यात हे ड्रग्ज सापडले. तिला एनडीपीएस कायद्यानुसार अटक करून न्यायालयात हजर केले. २९ सप्टेंबर रोजी…

Read More

अभिजित दीपकेंकडून शिवाजी महाराजांचा अपमान?:‘कॉकरोच’च्या फोटोवरून नितेश राणेंचा संताप, माफी मागण्याची मागणी

कॉकरोच जनता पार्टीकडून 2 ऑक्टोबर रोजी मुंबईतील शिवाजी पार्क येथे प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांच्यावर गंभीर आरोप करत छत्रपती शिवाजी महाराजांचा कथित अवमान केल्याचा दावा केला आहे. दीपके यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका फोटोवरून राणे यांनी आक्षेप घेतला असून, या…

Read More

दिवेआगर समुद्रकिनारी मोठी दुर्घटना:सहलीसाठी आलेल्या 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध दिवेआगर समुद्रकिनारी गुरुवारी मोठी आणि दुर्दैवी दुर्घटना घडली. पुणे जिल्ह्यातील आळंदी परिसरातून सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांपैकी समुद्रात पोहण्यासाठी उतरलेले ८ विद्यार्थी पाण्यात बुडाले. या घटनेत आठही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. समुद्राच्या पाण्याची खोली आणि लाटांचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. आळंदीहून सहलीसाठी दिवेआगरला आले होते…

Read More

जवाहर नवोदय विद्यालय कन्नड:इयत्ता 9 वी व 11 वी प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास 15 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

पीएम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय, कन्नड (जि. छत्रपती संभाजीनगर) येथे शैक्षणिक वर्ष 2027-28 साठी इयत्ता 9 वी आणि इयत्ता 11 वी (विज्ञान शाखा) प्रवेश परीक्षेकरिता ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या अंतिम मुदतीत 15 ऑक्टोबर 2026 पर्यंत वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची मुदत 1 सप्टेंबर 2026 ते 30 सप्टेंबर 2026 अशी निश्चित करण्यात…

Read More

दुष्काळाने महाराष्ट्र होरपळतोय, तरी सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही:वाल्मीक कराड प्रकरणावरून हर्षवर्धन सपकाळांचा सरकारवर घणाघात

महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती आणि वाल्मीक कराड-संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. महाराष्ट्रातील सुमारे 70 ते 75 टक्के भाग दुष्काळाने होरपळत असल्याचा दावा करत शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी त्यांनी केली. त्याचवेळी वाल्मीक कराड प्रकरणाचा संदर्भ देत राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. टिळक भवन, मुंबई येथे काँग्रेसच्या…

Read More

अधीर रंजन यांचे ममता बॅनर्जी यांना काँग्रेसमध्ये परतण्याचे निमंत्रण:म्हणाले- बंगालमध्ये आपला नेता निवडून घेऊ; 30 वर्षांपूर्वी काँग्रेस सोडून TMC स्थापन केली होती

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी गुरुवारी ममता बॅनर्जी यांना पुन्हा काँग्रेसमध्ये सामील होण्याचे निमंत्रण दिले. मुर्शिदाबादमध्ये त्यांनी ममता यांना उर्वरित TMC आमदार आणि खासदारांसह काँग्रेसमध्ये सामील होण्यास सांगितले. चौधरी म्हणाले की, काँग्रेस बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचे नेतृत्व स्वीकारून त्यांच्यासोबत काम करण्यास तयार आहे. त्यांनी काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वालाही या दिशेने पावले उचलण्याचे आवाहन केले. त्यांनी…

Read More

Sarva Foam Industries Files DRHP for IPO; Kunal Gyani Plans Stake Sale

मुंबई11 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशातील सर्वात मोठी रीबॉन्डेड पॉलीयुरेथेन फोम उत्पादक आणि निर्यातदार कंपनी सर्वा फोम इंडस्ट्रीज लिमिटेडने IPO साठी सेबीकडे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) म्हणजेच ड्राफ्ट कागदपत्रे दाखल केली आहेत. कंपनी आपल्या या इनिशियल पब्लिक ऑफरिंगअंतर्गत ₹5 दर्शनी मूल्याचे शेअर्स जारी करणार आहे. यात 54,00,000 इक्विटी शेअर्सचा फ्रेश इश्यू आणि प्रवर्तक कुणाल ज्ञानी…

Read More

हिंगोली जिल्ह्यात "एक दिन, एक घंटा, एक साथ" महा-श्रमदान उत्साहात:नरसी नामदेव येथील परिसरात केली स्वछता

हिंगोली जिल्हा परिषदेच्या वतीने एक दिन एक घंटा एक साथ महाश्रमदान या उपक्रमांतर्गत गुरुवारी ता . १ नरसी नामदेव येथे कयाधू नदीचा परिसर स्वच्छ करण्यात आला. यावेळी प्रशासनाचे अधिकारी कर्मचाऱ्यांसह गावकऱ्यांची उपस्थिती होती स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ दरम्यान राबविण्यात येत असलेल्या “स्वच्छता ही सेवा” मोहिमेंतर्गत हिंगोली जिल्ह्यात विविध…

Read More

Pune RTO MH-61 Series Auction; Fancy Numbers For Transport Vehicles

पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात ‘एमएच-६१’ मालिकेतील आकर्षक व पसंतीच्या नोंदणी क्रमांकांसाठी लिलाव प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मालवाहू, टुरिस्ट टॅक्सी, बस आणि ॲम्ब्युलन्ससह परिवहन वाहनांसाठी नवीन मालिका सुरू करण्यात येत आहे. तसेच खासगी चारचाकी वा . खासगी चारचाकी वाहनांसाठी पसंती क्रमांक मिळविण्यासाठी ५ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.३० या वेळेत परिवहन नवीन नोंदणी विभागात…

Read More