वाशिममध्ये अवैध सावकारीविरोधात मोठी कारवाई:दोन बहिणींच्या घरातून 88 किलो चांदी, 13 लाखांची रोकड जप्त
वाशिम शहरात अवैध सावकारीविरोधात सहकार विभागाने पोलिसांच्या मदतीने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान दोन महिला सावकारांच्या घरांची झडती घेण्यात आली. या झडतीत तब्बल 88 किलो चांदीच्या विटा आणि बिस्किटे, तसेच 13 लाख 300 रुपयांची रोकड आढळून आली. जप्त करण्यात आलेल्या चांदीची किंमत अंदाजे 2 कोटी रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे वाशिम…