कन्नडच्या नवरा-नवरी डोंगरावर उत्खनन:प्रशासनाच्या विरोधात ‘सत्याग्रह’ आंदोलन, अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित
तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या रेल नावडी शिवारातील गट क्रमांक ५२ मधील प्रसिद्ध नवरा-नवरीचा डोंगर पोखरून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दोषींवर कारवाई आणि स्वतंत्र चौकशीच्या मागणीसाठी किसान सभेच्या वतीने महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर १ ऑक्टोबर रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर जोरदार सत्याग्रह आंदोलन छेडण्यात आले. किसान…