Headlines

सरकारने म्हटले- देशात गॅसची कोणतीही कमतरता नाही:पॅनिक खरेदी टाळण्यास सांगितले, 95% ग्राहकांची आता डिजिटल माध्यमातून बुकिंग

देशात एलपीजी सिलेंडरचा पुरवठा पूर्णपणे स्थिर आणि पुरेसा आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने (MoPNG) नागरिकांना खात्री दिली आहे की त्यांना घाबरण्याची किंवा पॅनिक खरेदी करण्याची गरज नाही. मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की सध्याचे वितरण नेटवर्क खूप मजबूत आहे आणि देशभरातील घरांमध्ये कोणत्याही अडथळ्याशिवाय गॅस पोहोचवला जात आहे. सरकार यावर सतत लक्ष ठेवून आहे. 95%…

Read More

रस्ता सुरक्षा आणि कार्यक्षमतेसाठी योगाभ्यास आवश्यक:मोटर वाहन निरीक्षक वसंत कलंबरकर यांचे प्रतिपादन, दिव्य मराठीशी साधला संवाद

रस्ता अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि सुरक्षित वाहन चालविण्याची संस्कृती रुजविण्यासाठी योगसाधना अत्यंत प्रभावी माध्यम असल्याचे प्रतिपादन मोटर वाहन निरीक्षक तथा योगशास्त्री वसंत कलंबरकर यांनी दिव्य मराठीशी बोलतांना केले. जागतिक योग दिनाच्या निमित्ताने बोलतांना त्यांनी ‘योगिक प्रक्रिया, रस्ता सुरक्षा आणि कार्यक्षमता’ या लेखातून त्यांनी योग आणि वाहन चालक यांचा थेट संबंध स्पष्ट केला आहे. रस्ता…

Read More

पुणे शहरात दोन दुचाकीस्वारांचा अपघाती मृत्यू:विश्रांतवाडी, लोणी काळभोर परिसरात घडल्या घटना

पुणे शहरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे. विश्रांतवाडी आणि पुणे-सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर परिसरात या घटना घडल्या. विश्रांतवाडी येथे भरधाव दुचाकी घसरल्याने अजयकुमार डोमन मंडल (वय ३०, रा. येरवडा, मूळ बिहार) या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी सुजीत सहानी (वय ३०, रा. विश्रांतवाडी) जखमी झाला. सहानी यांनी विश्रांतवाडी पोलीस…

Read More

लोहगड हत्या प्रकरण:खटला जलदगती न्यायालयात चालणार; अ‍ॅड. उज्ज्वल निकमांची एंट्री; सिया केतनच्या अडचणीत वाढ

राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या पुण्याच्या लोहगड हत्या प्रकरणाने पुरुषांवरील अत्याचाराची एक अतिशय गंभीर बाजू समाजासमोर आणली आहे. स्वतःच्याच होणाऱ्या नवऱ्याला (केतन अग्रवाल) आपल्या प्रियकराच्या मदतीने कट रचून निर्दयीपणे संपवल्याचा धक्कादायक प्रकार यात उघडकीस आला आहे. या भीषण गुन्ह्याप्रकरणी पुणे पोलिसांनी मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन या दोघांनाही बेड्या ठोकल्या असून, या प्रकरणाचा…

Read More

कमिटमेंटने नाही, चुकीच्या नात्यांना घाबरा:पद्मकुमार, सिद्धार्थ मेनन, विधात्री बंदी यांनी थेरपी, सन्मान आणि बदलत्या नात्यांवर मांडले मत

‘नातेसंबंध जपण्यापेक्षा त्यांना समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे’ – हीच विचारसरणी ‘मॅक्स, मिन अँड म्याऊझाकी’ या चित्रपटाच्या कथेच्या केंद्रस्थानी आहे. हा चित्रपट प्रेम आणि विरहाबरोबरच मानसिक आरोग्य, एकाकीपणा, नात्यांमधील संवाद, वचनबद्धता आणि स्वतःशी जोडले जाणे यांसारख्या विषयांवर भाष्य करतो. दिग्दर्शक पद्मकुमार नरसिम्हामूर्ती, अभिनेता सिद्धार्थ मेनन आणि अभिनेत्री विधात्री बंदी यांनी दैनिक दिव्य मराठीशी संवाद साधताना…

Read More

बंगालमधील सिलीगुडी येथे PM मोदींची सभा:3.6 कोटी लोक पहिल्या टप्प्यात मतदान करतील; तामिळनाडूमध्ये राहुल गांधींचा रोड शो

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पश्चिम बंगाल दौऱ्याचा आज रविवार दुसरा दिवस आहे. पंतप्रधान आज सिलीगुडी येथे सभेला संबोधित करतील. यावेळी ते दार्जिलिंग जिल्ह्यातील सर्व 5 आणि जलपाईगुडी जिल्ह्यातील सर्व 7 जागांवर भाजपच्या उमेदवारांसाठी मते मागतील. यापूर्वी, पंतप्रधानांनी शनिवारी बंगालमधील पूर्व वर्धमान जिल्ह्यातील कटवा, मुर्शिदाबादमधील जंगीपूर आणि दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यातील कुशमंडी येथे तीन सभांना संबोधित केले…

Read More

थरूर म्हणाले- महिला आरक्षण कायद्याला राजकीय शस्त्र बनवू नका:बिलासोबत सीमानिर्धारण प्रक्रियेत घाई केल्याने राज्यांचे लोकशाही संतुलन बिघडेल

काँग्रेस नेते शशी थरूर म्हणाले की, महिला आरक्षण कायद्यात होणाऱ्या सुधारणांचा राजकीय हत्यार म्हणून वापर केला जाऊ नये, जेणेकरून संघराज्य कमकुवत होऊ नये आणि संसदेच्या प्रतिष्ठेला धक्का लागू नये. संसदेत १६ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या विशेष अधिवेशनापूर्वी थरूर यांनी आरोप केला की, सरकार ३ दिवसांच्या संसद अधिवेशनाचा वापर राज्य निवडणुकांपूर्वी राजकीय फायदा घेण्यासाठी आणि २०२९ च्या…

Read More

पालघर हादरले!:तलासरीत 19 वर्षीय तरुणीवर सहा जणांकडून सामूहिक अत्याचार; तिघांना बेड्या, इतर तिघांचा शोध सुरू

राज्यातील महिलांवर तसेच तरुणींवरील लैंगिक अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. पालघर जिल्ह्यातील तलासरी येथे एका धक्कादायक आणि संतापजनक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून फिरण्यासाठी गेलेल्या एका तरुणीवर सहा जणांनी मिळून सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. या अमानुष घटनेमुळे पालघर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण…

Read More

जिल्हाधिकारी गौडा यांचा उद्योजकांशी संवाद:औद्योगिक विकास, कौशल्य, पायाभूत सुविधांवर भर देण्याचे आश्वासन; दर 3 महिन्यांनी बैठक

छत्रपती संभाजीनगर येथे चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर (सीएमआयए) द्वारे आयोजित उद्योग-प्रशासन संवाद कार्यक्रमात जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी उद्योजकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील औद्योगिक विकास, कौशल्य विकास, पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटीवर भर देण्याचे आश्वासन दिले. उद्योगांशी समन्वय साधण्यासाठी दर तीन महिन्यांनी अशा प्रकारच्या बैठका आयोजित केल्या जातील, अशी घोषणाही त्यांनी केली….

Read More

महाराष्ट्र ATS ची मोठी कारवाई!:पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी संपर्कात असलेल्यांवर राज्यभरात 150 ठिकाणी छापे

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने पाकिस्तानातील गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी सोशल मीडियाद्वारे कथित संपर्कात असलेल्या व्यक्तींविरोधात मोठी मोहीम हाती घेतली आहे. या संशयास्पद हालचालींच्या पार्श्वभूमीवर, एटीएसने मुंबई, ठाणे, कुर्ला, वांद्रे, जोगेश्वरी, नवी मुंबई, मीरा रोड, भाईंदर, सांगली, सातारा आणि छत्रपती संभाजीनगरसह राज्यभरातील 150 हून अधिक ठिकाणी एकाच वेळी छापे टाकून व्यापक शोधमोहीम सुरू केली आहे. या…

Read More