Headlines

भररस्त्यात प्रसूतीचा थरार; डॉक्टर ठरल्या देवदूत, आई-बाळाचा जीव वाचला:प्रसूती कळांमध्ये विव्हळणाऱ्या मातेला दिलासा

पुणे जिल्ह्यातील शिरूर भागात माणुसकी आणि कर्तव्याची अनोखी सांगड घालणारी एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. प्रसूतीच्या तीव्र कळांनी त्रस्त झालेल्या एका गरोदर महिलेला वेळेत रुग्णालयात पोहोचता न आल्याने भररस्त्यातच बाळाला जन्म द्यावा लागला. मात्र, या कठीण प्रसंगात एका महिला डॉक्टरने धाडस दाखवत आई आणि नवजात बालकाचा जीव वाचवला. या घटनेमुळे परिसरात त्या डॉक्टरांविषयी कृतज्ञता…

Read More

'शिवाजी कोण होता' पुस्तकावरून वाद:रोहिणी खडसे म्हणाल्या- संभ्रम निर्माण करण्यात सत्ताधाऱ्यांची PhD; संजय गायकवाडवर गुन्हा दाखल करा- विजय वडेट्टीवार

कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाच्या शीर्षकावरून नवा वाद उफाळून आला असून बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. हे शीर्षक छत्रपती शिवाजी महाराजांचा अनादर करणारे असल्याचा दावा करत गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोनवरून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ व धमकी दिल्याची तक्रार समोर आली आहे….

Read More

अमरावतीत इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन:जयस्तंभ चौकात केंद्र सरकारविरोधात जोरदार निदर्शने

अमरावती शहर काँग्रेस कमिटीने मंगळवार, २६ मे रोजी जयस्तंभ चौकात केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीविरोधात तीव्र निदर्शने केली. केंद्र सरकारने सलग चौथ्यांदा इंधनाच्या दरात वाढ केल्याने सामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. वाढत्या इंधन दरांमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून, महागाईचे भीषण संकट ओढवले असल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला. यावेळी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार…

Read More

"तुमचे सळसळते रक्त थंड होऊ देऊ नका..":आदित्य ठाकरे आक्रमक, 24 तारखेला शिवाजी पार्कवर तरुणांसह राष्ट्रगीत गाणार

नीट पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीतील जंतरमंतरवर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असून, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली जात आहे. या आंदोलनाला अनेक राजकीय पक्ष आणि विविध संघटनांसोबतच आता शिवसेना ठाकरे गटानेही आपला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. खुद्द उद्धव ठाकरे यांनी दिल्लीला जाऊन जंतरमंतरवरील या आंदोलनात सहभागी होत विद्यार्थ्यांना बळ दिले आहे. याचबरोबर, ठाकरे गटाचे…

Read More

Amit Thackeray Slams Mahayuti Govt Over NEET Exam Opposition

तामिळनाडू सरकारने विधानसभेत ‘नीट’ परीक्षा रद्द करून बारावीच्या गुणांवर वैद्यकीय प्रवेश देण्याचा ठराव मंजूर केल्यानंतर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. राजकारण शेवटी विद्यार्थ्यांच्या आणि सामान् . अमित ठाकरे म्हणाले, जो निर्णय आज तामिळनाडूने घेतला, तो महाराष्ट्र सरकारने काही वर्षांपूर्वीच घ्यायला हवा होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी…

Read More

ट्रान्सफॉर्मर स्फोटात 3 शेतकऱ्यांचा मृत्यू:छत्तीसगडमध्ये शेतात काम करताना दुर्घटना, गरम तेलाने भाजले; पिता-पुत्राची एकत्र अंत्ययात्रा

छत्तीसगडमधील बेमेतरा जिल्ह्यातील मोहतरा गावात ट्रान्सफॉर्मर फुटल्याने भाजलेल्या पिता-पुत्रासह तीन शेतकऱ्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना २० सप्टेंबर रोजी रविवारी हेमबंद खार येथे घडली होती. स्फोटानंतर ट्रान्सफॉर्मरमधून गरम तेल आणि आगीच्या ज्वाळा पसरल्या, ज्याच्या तडाख्यात येऊन तिघेही गंभीररीत्या भाजले होते. अपघातानंतर तिघांना प्रथम बेमेतरा जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथून गंभीर प्रकृतीमुळे त्यांना रायपूरला हलवण्यात आले….

Read More

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचे अनावरण:देशव्यापी स्पर्धेतून निवड; 70 आंतरराष्ट्रीय स्पर्धकांसह 3,067 प्रवेशिका

नाशिक त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा आयोजित होत आहे. या कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचे अनावरण सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कुंभमेळ्याच्या लोगोसाठी कुंभमेळा प्राधिकरणाच्यावतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सुमारे तीन हजारांहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धकांमधून तीन…

Read More

'लाईट बंद करण्याची परमिशन कुणी दिली?':जाब विचारत वीज कर्मचाऱ्याची पकडली कॉलर; गेवराई गावात राडा, दोघांवर गुन्हा दाखल

महावितरणच्या एरिअल बंच केबलचे काम करण्यासाठी गेलेल्या वीज कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की झाल्याचा धक्कादायक प्रकार गेवराई गावात घडला आहे. ‘लाईट का बंद केली?’ असा जाब विचारत कर्मचाऱ्यांची कॉलर पकडून त्यांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली चिकलठाणा पोलिस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्युत तारांचे काम करताना धक्काबुक्की…

Read More

भारतीय घरांमध्ये जगातील टॉप-10 बँकांपेक्षा जास्त सोने:याची किंमत ₹830 लाख कोटी; एवढी अमेरिका-चीन वगळता इतर कोणत्याही देशाची जीडीपी नाही

भारतीय घरांमध्ये आणि मंदिरांमध्ये 50,000 टन सोने ठेवलेले आहे, ज्याची किंमत सुमारे 10 ट्रिलियन डॉलर म्हणजेच अंदाजे ₹830 लाख कोटी आहे. भारतीय व्यापाऱ्यांच्या संघटना असोचॅम (द असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया) च्या अहवालानुसार, हे जगातील सर्वात मोठ्या 10 सेंट्रल बँकांच्या एकूण साठ्यापेक्षाही जास्त आहे. भारतीयांकडे इतके सोने आहे की अमेरिका आणि चीन…

Read More

वेरूळमध्ये श्रावणाचा पहिला दिवस ठरला वाहतूक कोंडीचा:10 हजार भाविकांनी घेतले घृष्णेश्वराचे दर्शन‎

पवित्र श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी १२ वे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री घृष्णेश्वर मंदिर परिसर आणि वेरूळ-खुलताबाद मार्गावर प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका भाविकांना बसला. अपुऱ्या सुविधा आणि वाहतूक कोंडीमुळे यंदा पहिल्या दिवशी भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात घटल्याचे पाहायला मिळाले. मागील वर्षी योग्य नियोजनामुळे पहिल्या श्रावणी सोमवारी ३५ हजार भाविकांनी सुलभ दर्शन घेतले होते. मात्र, यावर्षी नियोजनाच्या अभावामुळे…

Read More