26 वर्षांपासून नि:स्वार्थ सेवा:वारकऱ्यांना दररोज 12 हजार कप आयुर्वेदिक चहाचे वाटप
आषाढी वारी म्हणजे भक्ती, सेवा आणि समर्पणाचा संगम. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी पैठणच्या वतीने गेल्या २६ वर्षांपासून मोफत आयुर्वेदिक चहा, शुद्ध पिण्याचे पाणी आणि बिस्किटांचे वाटप अखंडपणे सुरू आहे. वारीदरम्यान पाऊस, ऊन, वारा तसेच अशुद्ध पाण्यामुळे अनेक वारकऱ्यांना सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी यांसारख्या त्रासांना सामोरे जावे…