पुण्यातील बोपदेव घाट परिसरात बुधवारी (25 नोव्हेंबर) एक अत्यंत हृदयद्रावक आणि काळजाचा थरकाप उडवणारी दुर्घटना घडली आहे. महाविद्यालय सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी बस स्टॉपवर बसची वाट पाहत उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या घोळक्यात एका भरधाव आयशर टेम्पोने थे
.
नेमका अपघात कसा घडला?
प्राथमिक माहितीनुसार, हे सर्व विद्यार्थी एकाच महाविद्यालयाचे असून ते नेहमीप्रमाणे बोपदेव घाट परिसरातील बस स्टॉपवर बसची वाट पाहत उभे होते. बोपदेव घाटाच्या तीव्र उतारावरून एक आयशर टेम्पो प्रचंड वेगाने खाली येत होता. उतारावर चालकाचे या अवजड टेम्पोवरील नियंत्रण अचानक सुटले.
वाहनांना धडका देत विद्यार्थ्यांच्या घोळक्यात घुसला
अनियंत्रित झालेल्या या भरधाव टेम्पोने सुरुवातीला एका वाहनाला धडक दिली आणि त्यानंतर थेट बस स्टॉपवर उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या घोळक्यात घुसून विद्यार्थ्यांना चिरडले. एवढ्यावरच न थांबता या टेम्पोने पुढे उभ्या असलेल्या आणखी काही वाहनांनाही जोरदार धडक दिली.
2 विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू, 3 जण गंभीर
या भीषण दुर्घटनेत 2 विद्यार्थ्यांनी जागीच प्राण गमावले, तर 3 विद्यार्थी गंभीररीत्या जखमी झाले आहेत. अपघातानंतर परिसरात एकच आरडाओरडा आणि खळबळ उडाली.
पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल; गुन्हा दाखल करून तपास सुरू
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. गंभीर जखमी झालेल्या 3 विद्यार्थ्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अपघात नेमका कशामुळे झाला—टेम्पोचा ब्रेक निकामी झाला होता की चालकाच्या निष्काळजीपणामुळे नियंत्रण सुटले—याचा सखोल तपास सुरू केला आहे. तसेच, मृत आणि जखमी विद्यार्थ्यांची अधिकृत ओळख पटवण्याची व त्यांच्या कुटुंबीयांना कळवण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू आहे.
——————————–
हेही वाचा…
4 दिवसांपूर्वी तुरुंगातून बाहेर आलेल्या आरोपीवर पुण्यात कोर्टाबाहेरच जीवघेणा हल्ला:गोळीबारानंतर कोयत्याने दोन्ही हात छाटले; सुप्रिया सुळे, वडेट्टीवारांचा गृहखात्यावर संताप

अवघ्या 4 दिवसांपूर्वीच तुरुंगातून जामिनावर बाहेर आलेल्या एका हत्या प्रकरणातील आरोपीवर पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाच्या बाहेर दिवसाढवळ्या प्राणघातक हल्ला झाला. 20 एप्रिल 2025 रोजी कात्रज येथील संतोषनगरमध्ये झालेल्या शुभम सुभाष चव्हाण याच्या हत्येतील मुख्य आरोपी मंदार मारुती किवळे याच्यावर बुधवारी (25 नोव्हेंबर) दुपारी पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या गेट नंबर 4 बाहेर अत्यंत क्रूरपणे हल्ला करण्यात आला आहे. न्यायालयीन कामकाजासाठी आला असता 6 ते 7 हल्लेखोरांनी सापळा रचून आधी त्याच्यावर गोळीबार केला आणि त्यानंतर कोयत्याने सपासप वार केले. या रक्तरंजित थरारानंतर पुण्याच्या कायदा-सुव्यवस्थेवरून राजकारण तापले असून खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र शब्दांत टीकास्त्र सोडले आहे. याप्रकरणी 7 संशयित आरोपींची नावेही समोर आली असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. येथे वाचा संपूर्ण बातमी