करमाळ्यात एकल महिलांचा गौरव:अर्जुननगर ग्रामपंचायतीत एकल महिला दिन उत्साहात साजरा
करमाळा अर्जुननगर येथील ग्रामपंचायत कार्यालयात जागतिक एकल महिला दिनाचे औचित्य साधून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समाजात कोणत्याही आधाराशिवाय स्वाभिमानाने जगणाऱ्या आणि आपल्या कुटुंबाचा गाडा समर्थपणे ओढणाऱ्या एकल महिलांच्या संघर्षाला सलाम करण्यासाठी हा सोहळा घेण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी सरपंच अश्विनी थोरात व चंद्रकला भोगे या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे…