धावत्या रेल्वेत महिलेची पर्स चोरणारे दोघे ताब्यात:इगतपुरी लोहमार्ग पोलिस, सुरक्षाबलाची कारवाई
इगतपुरी मुंबईकडे जाणाऱ्या धावत्या राज्यराणी एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलेची पर्स चोरी करणाऱ्या आरोपीचा इगतपुरी लोहमार्ग पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बलाने संयुक्त तपासातून पर्दाफाश केला. या प्रकरणात एका आरोपीसह एका विधीसंघर्षिताला ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून ४ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. चोरीस गेलेल्या पर्समध्ये दोन मोबाईल, सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम…