दस्तनोंदणीस नकार दिल्याने सहदुय्यम निबंधकाला मारहाण:आंबेगाव कार्यालयात घडला प्रकार, वकिलासह तिघांविरुद्ध गुन्हा
आंबेगाव येथील सहदुय्यम निबंधक कार्यालयातील प्रभारी अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी एका वकिलासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दस्तनोंदणीस नकार दिल्याच्या रागातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. रवींद्र कोळी यांनी या प्रकरणी आंबेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र कोळी हे वरिष्ठ लिपिक असून, गेल्या महिन्याभरापासून ते आंबेगाव येथील सहदुय्यम निबंधक कार्यालयात प्रभारी…