पुणे जिल्ह्यात 84 बालकांना मिळाले हक्काचे कुटुंब:दत्तक प्रक्रियेतील सर्वाधिक प्रकरणांना अंतिम मंजुरी, जिल्हा प्रशासनाची कामगिरी
पुणे जिल्ह्यात दत्तक प्रक्रियेतील 84 प्रकरणांना अंतिम मंजुरी मिळाली आहे. यामुळे 84 बालकांना कायदेशीररित्या नवीन कुटुंबे मिळाली असून, अनेक पालकांची प्रतीक्षा संपली आहे. ही प्रक्रिया जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, पुणे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडली. केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरणामार्फत राबविण्यात येत असलेल्या दत्तक विधान अधिनियम 2022 नुसार, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये दत्तक प्रक्रिया आता जिल्हाधिकारी…