केवळ झाडे लावणे, ती जगवणे हीच खरी सेवा:आलेगावात होणार 70 वडांचा वाढदिवस, विद्यार्थी व शिक्षकांनी घेतली पर्यावरण रक्षणाची शपथ
. दैनिक दिव्य मराठी ‘एक वृक्ष एक जीवन’ अभियान राबवत आहे. या अंतर्गत जिल्हाभरातील शाळा, महाविद्यालये, बगीचे, शहर व गावातील मोकळ्या जागांमध्ये नागरिक, पर्यावरणप्रेमी, शाळा, महाविद्यालयांमध्ये वृक्षलागवड करण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ नुकताच अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या हस्ते वृक्षलागवड करुन करण्यात आला. ‘दिव्य मराठी’च्या या अभियानात…