महारक्तदान शिबिराच्या माध्यमातून 1,298 रक्त पिशव्यांचे केले संकलन:राज्य उत्पादन शुल्क विभाग; जिल्हा देशी-विदेशी मद्य विक्रेता संघाचा उपक्रम
सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि जिल्हा देशी-विदेशी मद्य विक्रेता संघाच्या महारक्तदान शिबिरात १ हजार २९८ रक्तदात्यांनी रक्तदान करून एक नवीन उच्चांक प्रस्थापित केला आहे. हॉटेल ग्रँड महफीलच्या रुबी हॉल येथे हे शिबिर पार पडले. शिबिराचे उद्घाटन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, व बळवंतराव…