वरूड येथील वनस्पतिशास्त्र विभागातर्फे नागठाणा परिसरात वृक्षारोपण उपक्रम:नैसर्गिक पद्धतीने वनस्पतींची संख्या वाढवण्याचा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा प्रयत्न
येथिल महात्मा फुले कला, वाणिज्य व सीतारामजी चौधरी विज्ञान महाविद्यालयातील वनस्पतिशास्त्र विभागातर्फे नागठाणा परिसरात निसर्ग संवर्धनासाठी बीजप्रसारण व वृक्षारोपणाचा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला आहे. हा उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षसंवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण आणि हरित परिसर निर्मितीची गरज वाढत आहे. हे लक्षात घेऊन आयोजित केलेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांना…