मुंबईत साकीनाका परिसरात अग्नितांडव:भंगार गोदामाला लागलेल्या भीषण आगीत दोघांचा होरपळून मृत्यू, 6 जण गंभीर जखमी; 70 गाळे आगीच्या विळख्यात
अंधेरी पूर्वेकडील साकीनाका परिसरात मंगळवारी सायंकाळी एका भंगार गोदामाला लागलेल्या भीषण आगीत दोघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत 6 जण भाजले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांची ओळख अद्याप पटलेली नसून, त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. आगीने घेतले रौद्ररूप साकीनाका परिसरातील कैराणी रोडवर असलेल्या अब्दुल रशीद कंपाउंडमध्ये मंगळवारी सायंकाळी ही आग लागली….