भावी निमगावात शमीपूजनाची परंपरा; आपट्याची पाने लुटून दिल्या शुभेच्छा:बौद्ध महासभेतर्फे सिद्धार्थ बुद्ध विहारात त्रिशरण, पंचशील, बुद्धपूजा
वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक असलेला विजयादशमीचा सण शेवगाव तालुक्यातील भावी निमगाव येथे पारंपरिक उत्साहात साजरा झाला. गावातील आबालवृद्धांनी एकत्र येत ढोल-ताशांच्या गजरात सीमोल्लंघन केले. शमीच्या वृक्षाचे विधिवत पूजन करून आपट्याची पाने लुटण्यात आली. त्यानंतर एकमेकांना ही पाने देत ‘सोन्यासारखे राहा’ अशा शुभेच्छा देण्यात आल्या. या सोहळ्यातून गावातील सामाजिक एकोपा आणि परंपरेचे दर्शन घडले. सायंकाळी पाचच्या…