Headlines

चपळगाव, बावकरवाडमध्ये घटासाठी घरपोच धान्य सेवा:माजी सरपंच वर्षा भंडारकवठे यांचा घटात धान्य पेरणीचा धार्मिक परंपरा जतन करण्याचा उपक्रम‎

नवरात्रो पार्श्वभूमीवर चपळगाव आणि बावकरवाडी येथे घटस्थापनेसाठी लागणाऱ्या धान्याचे घरोघरी वाटप करण्यात आले. माजी सरपंच वर्षा भंडारकवठे यांच्या संकल्पनेतून राबवला. अनेक कुटुंबांना याचा लाभ झाला. धार्मिक परंपरेचे जतन करत सर्वसामान्य कुटुंबांच्या गरजा लक . सामाजिक बांधिलकीतून जपतात सेवाकार्य उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी बचत गटांतील महिला, विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच गावातील तरुणांनी सहकार्य केले. धान्याचे किट तयार करणे आणि…

Read Full News

ललित पंचमीनिमित्त राज्यभरात एकाच वेळी होणार सामूहिक नामस्मरण सोहळा:समर्थ नगरी परिवाराचा उपक्रम; महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक व अमेरिकेतही आयोजन‎

अक्कलकोट स्टेशन श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अक्कलकोट आगमन दिनानिमित्त ललित पंचमीला राज्यभर एकाच वेळी सामूहिक नामस्मरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अक्कलकोट येथील समर्थ नगरी परिवाराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उपक्रम राबवण्यात येणार असून . सर्व स्वामीभक्तांनी आपल्या गावात एकत्र येऊन या सोहळ्यात सहभागी व्हावे आणि स्वामीचरणी सेवा अर्पण करावी, असे आवाहन समर्थ नगरी अध्यात्मिक…

Read Full News

दुष्काळाचा फटका; पंढरपुरात चाऱ्याची आवक घटली:दर हजार रुपयांनी वाढले, पशुपालकांची कसरत; हिरव्या चाऱ्याचे दर टनामागे 4 ते 6 हजारांपर्यंत‎

. दुष्काळी परिस्थितीचा फटका आता जनावरांच्या चारा उपलब्धतेलाही बसू लागला आहे. पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोजची चाऱ्याची आवक घटली असून, दुसरीकडे चाऱ्याच्या दरात ३० ते ४० टक्के पर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था करताना पशुपालकांना आर्थिक कसरत करावी लागत आहे. यंदा पावसाअभावी पंढरपूर तालुक्यात हिरव्या चाऱ्याची उपलब्धता कमी झाली आहे.खरिपाची कसलीच पेरणी…

Read Full News

मंगळवेढ्यात नैसर्गिक जलस्रोतावरील अतिक्रमणामुळे टँकर सुरू करण्याची वेळ:नदी, नाले, ओढ्यांवरील अतिक्रमण हटवले तर पाणीटंचाई साठवणुकीस मदत

उच्च न्यायालयाचे नैसर्गिक जलस्रोत अतिक्रमणमुक्त करण्याचे आदेश दिलेले असताना त्याची अंमलबजावणी न झाल्यामुळे पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाणी साठवणूक न झाल्याने अशी परिस्थिती उद्भवली आहे. गावोगावी टँकर सुरू करावे लागत आहेत. मूळ नैसर्गिक जलस्रोत ख . सद्य परिस्थितीत तालुक्यातील ८२ गावांपैकी ६६ गावांत नैसर्गिक जलस्त्रोत आहेत. मात्र त्यावर अतिक्रमण झाल्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागत…

Read Full News

कुत्र्यांच्या दहशतीने नेवासकर रस्त्यावर; प्रशासनाला साडी अन् बांगड्यांचा आहेर:कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे नागरिकांत संताप, कारवाईचे नगराध्यक्षांचे आश्वासन‎

शहरातील मोकाट कुत्र्यांचा आणि जनावरांचा वाढत्या उपद्रवामुळे नागरिक त्रस्त झाले असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेच्या निषेधार्थ सोमवारी नेवासकरांनी नगरपंचायतीवर धडक मोर्चा काढला. पिसाळलेल्या कुत्र्यांच्या हल्ल्यांत वृद्ध महिला आणि शाळकरी मुलांसह अनेक जण जखमी झाल्याच्या घटना घडूनही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत मोर्चेकऱ्यांनी बांगड्या आणि साडी देऊन प्रशासनाचा निषेध केला. सामाजिक कार्यकर्ते शांताराम गायके, शिवा राजगिरे आणि…

Read Full News

नाशिक- कुंभमेळ्यालगत भूजलात कॅन्सरचे घटक:पाण्यात निर्धारित मर्यादेपेक्षा 1,000 पट जास्त क्रोमियम-6; येथे 2027 मध्ये कुंभमेळा

महाराष्ट्रातील नाशिकमध्ये ऑगस्ट २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या आयोजनस्थळाजवळील अंबड औद्योगिक क्षेत्राच्या भूजलात कर्करोगाशी संबंधित विषारी घटक क्रोमियम-६ आढळले आहे. प्रयोगशाळेतील तपासणीत त्याचे प्रमाण ५०.३ मिलिग्रॅम प्रति लिटर नोंदवले गेले, जे पिण्याच्या पाण्यासाठी निर्धारित ०.०५ मिलिग्रॅम प्रति लिटर मर्यादेपेक्षा १,००० पटींहून अधिक आहे. दक्षिण आशिया धरणे, नद्या आणि जनसंघटना (SANDRP) साठी करण्यात आलेल्या तपासणीच्या निष्कर्षांमुळे लोकांच्या…

Read Full News

एआय शिक्षकाची जागा घेऊ शकत नाही; पूरक साधन म्हणून वापरा:प्रा. डॉ. हाफिजा खान यांचे प्रतिपादन, मानवी विचारशक्ती, एआयच्या संतुलनावर तज्ज्ञांचा भर‎

कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय) अनेक फायदे असले, तरी त्याचे तोटेही लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थी, संशोधक आणि अभ्यासकांनी एआयचा वापर सावधपणे करावा. एआय शिक्षकाची जागा घेऊ शकत नाही; मात्र अध्यापनासाठी उपयुक्त साधन ठरू शकते. एआय आणि मानवी विचा . के. जे. सोमैया महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षातर्फे ‘रिमॅजिनिंग हायर एज्युकेशन : इनोव्हेशन अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स…

Read Full News

रमाई घरकुल अनुदान:निधीचा हिशेब द्या, घरकुलाचे पैसे द्या, स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वारसांचा प्रश्न ऐरणीवर;भैलुमेंचा ठिय्या‎

दलित वस्तीचा निधी दलित वस्त्यांतील विकासकामांसाठीच वापरावा, रमाई घरकुल योजनेतील पहिला हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करावा, तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वारसांना न्याय मिळावा, या मागण्यांसाठी नगरसेवक भास्कर भैलुमे यांनी सोमवारी कर्जत नगरपंचायत कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. प्रभारी मुख्याधिकारी अजय साळवे यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून विविध मागण्यांवर लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. सत्ताधारी पदाधिकारी प्रशासनावर…

Read Full News

आयुष्यभर शेतात राबल्या; पहिल्यांदाच पाण्याचे वैभव पाहून भारावल्या..!:लोकहक्क फाउंडेशनच्या 80 महिला प्रशिक्षणार्थींची भंडारदरा धरणाला सहल

आयुष्यभर शेतात राबायचे, घर-संसार सांभाळायचा, कुटुंबाच्या गरजांसाठी झटायचे… पण ज्या पाण्यावर शेतीचे आणि संपूर्ण संसाराचे चक्र फिरते, त्या पाण्याचा अथांग साठा प्रत्यक्ष पाहण्याची संधी मात्र कधी मिळाली नाही. श्रीरामपूरमधील कष्टकरी आणि शेतकरी कुटुंबांतील . धरणाचे विस्तीर्ण जलाशय पाहताना महिलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. आपल्या हक्काचे पाणी येते कुठून, ते किती मोठ्या प्रमाणावर साठवले जाते,…

Read Full News

शाळेच्या विकासासाठी सरसावले ग्रामस्थ अन् माजी विद्यार्थी:खोसपुरी येथील माजी विद्यार्थी मेळाव्यात संकल्प व्यक्त, माजी विद्यार्थ्यांनी दिला आठवणींना उजाळा‎

माजी विद्यार्थी, ग्रामस्थ आणि शाळा यांच्यातील स्नेहबंध अधिक दृढ करत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोसपुरी येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत सामाजिक बांधिलकी जपण्याचा संकल्प केला. विशेष म्हणजे, ‘मिशन आपुलकी’ उपक्रमांतर्गत शाळेसाठी सुमारे ५० हजार रुपये खर्चाच्या गेट-कमानीच्या कामाला प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमाच्या…

Read Full News