Headlines

विद्यापीठ पातळीवर शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद उपक्रम घेणार- कुलगुरू खर्चे:डॉ. खर्चे यांची ग्वाही; शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेणार‎

प्रत्येक पिकातील समस्यांचे निवारण करण्यासाठी विद्यापीठ स्तरावर शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवादाचे कार्यक्रम घेण्यात येतील. यामध्ये आपल्या सूचना आम्हाला संशोधनासाठी मोलाच्या ठरतील. यावेळी शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी विद्यापीठ पुढाकार घेईल अशी ग्वाही महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी दिली. महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्र विभाग आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पिकावरील किड रोग सर्वेक्षण व…

Read Full News

एमपीएससी आंदोलनातून विद्यार्थ्यांना काय मिळाले:आ. विक्रम पाचपुते यांचा आ. रोहित पवारांना सवाल‎

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थी प्रतिनिधींशी चौथ्यांदा चर्चा करून सकारात्मक मार्ग काढल्याचा दावा भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी केला. विद्यार्थ्यांच्या मागण्यांना प्राधान्य दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानताना, आंदोलनातून विद्यार्थ्यांना नेमके काय मिळाले आणि राजकीय फायदा कोणाला झाला, याचे उत्तर रोहित पवार यांनी द्यावे, असे आव्हान त्यांनी दिले. पाचपुते म्हणाले, ३० सप्टेंबरला मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थी…

Read Full News

"नवजीवन'चे कबड्डीत दुहेरी यश; दोन्ही संघ जिल्हास्तरावर:17 व 19 वर्षांखालील गटांत मिळवले विजेतेपद‎

शेवगाव येथे झालेल्या तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धेत दहीगाव येथील नवजीवन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या कबड्डी संघांनी दुहेरी यश मिळविले. १७ वर्षांखालील गटात त्रिमूर्ती विद्यालय, शेवगाव, तर १९ वर्षांखालील गटात न्यू आर्टस् कॉलेज, शेवगावच्या संघाला पराभूत करून दोन्ही संघांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रवेश निश्चित केला. ८ ते १० ऑक्टोबरदरम्यान विखे पाटील कॅम्पस येथे झालेल्या स्पर्धेत नवजीवनच्या…

Read Full News

नवरात्रीला तमन्ना भाटिया 'माता की चौकी'त:मृणाल ठाकूर यांच्यासोबत गायली भजने; लिहिले- 5 तास भक्तीत तल्लीन होते

अभिनेत्री तमन्ना भाटिया यांनी नवरात्रीनिमित्त मातेच्या चौकीत सहभाग घेतला. त्यांच्या एका मैत्रिणीच्या घरी आयोजित करण्यात आलेल्या या धार्मिक कार्यक्रमात त्यांच्यासोबत अभिनेत्री मृणाल ठाकूरही उपस्थित होत्या. तमन्ना यांनी सोशल मीडियावर या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. त्यात त्या मृणाल ठाकूर यांच्यासोबत भजन गाताना आणि आरतीमध्ये सहभागी होताना दिसत आहेत. तमन्ना यांनी एक भावनिक संदेश…

Read Full News

बँक भरती घोटाळा- CBIचा 6 राज्यांत छापा:5 वर्षे जुने रेकॉर्ड तपासले, आय स्कॅनमध्ये 172 बोगस अधिकारी निष्पन्न; सर्वांची नोकरी जाणार

सीबीआयने बँक भरतीतील पाच वर्षे जुन्या डेटाची तपासणी करून नोकरी मिळवलेल्या बनावट उमेदवारांचा पर्दाफाश केला आहे. परीक्षेत घेतलेल्या डोळ्यांच्या स्कॅनच्या (आयरिस) आधारे गैरप्रकार करून नोकरी मिळवलेल्या २५७ संशयित उमेदवारांची माहिती समोर आली आहे. यापैकी १७२ जण वेगवेगळ्या बँकांमध्ये नोकरी करत होते. सीबीआय आता देशभरातील इतर बनावट अधिकाऱ्यांचा शोध घेत आहे. आयबीपीएसने या सर्व कार्यरत व्यक्तींसह…

Read Full News

यूपीच्या उन्नावमध्ये गंगा नदीला पूर, घरे बुडाली:हिमाचलमध्ये 4 दिवस पावसाचा इशारा, उत्तराखंडमध्ये ऑक्टोबरमध्येच हिमवृष्टी सुरू

हवामान विभागाने पश्चिम उत्तर प्रदेशातील १५ जिल्ह्यांत पावसाचा इशारा जारी केला आहे. गारपीट होण्याची शक्यताही व्यक्त केली आहे. यूपीची राजधानी लखनऊ सलग १५व्या दिवशीही पुराच्या तडाख्यात आहे. येथील वसाहतींमध्ये तीन-तीन फूटांपर्यंत पाणी साचले आहे. उत्तराखंडमधील पिथौरागढ येथे छिपलाकोटच्या उंच शिखरांवर ऑक्टोबरमध्येच बर्फाची चादर पसरली आहे. जवळपास दशकभरानंतर ऑक्टोबर महिन्यात येथे बर्फवृष्टी होत आहे. साधारणपणे या…

Read Full News

लोकवर्गणीतून शेतकऱ्यांनी साकारला तीन किमी रस्ता:शासनाच्या निधीची वाट न पाहता शेतकऱ्यांचा पुढाकार; नळवाडी परिसरात एकजुटीतून रस्ताकाम‎

सिन्नर, अकोले आणि संगमनेर या तीन तालुक्यांना जोडणाऱ्या सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरातील नळवाडी भागातील रस्त्याची दुरवस्था झाल्याने स्थानिक शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. शेतीमालाची वाहतूक, दैनंदिन दळणवळण आणि शेतात ये-जा क . गत आठवड्यात तीन किलोमीटर रस्त्याचे मजबुतीकरण झाल्यावर नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून स्थानिक ग्रामस्थांनी एकत्र येत मठाधिपती विलास महाराज भोसले यांच्या हस्ते…

Read Full News

जायखेडा–ताहाराबाद रस्त्यावरील माती हटविली:सलग तीन दिवस काम बंद पाडल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग‎

छत्रपती संभाजीनगर ते अहवा राज्य महामार्ग २० वरील जायखेडा–सोमपूर–ताहाराबाद दरम्यानच्या रस्ता कामात निकृष्ट मातीमिश्रित मुरूम वापरला जात असल्याचे उघडकीस आल्याने सोमपूर ग्रामस्थांनी सलग तीन दिवस काम बंद पाडत ग्रामस्थांनी कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सुस्त कारभाराचा निषेध केला. अखेर चौथ्या दिवशी अधिकाऱ्यांनी माती हटवण्याचे आणि ‘प्लॅन एस्टीमेट’ दाखवण्याचे आश्वासनानंतर तोडगा निघाला. कामाची दर्जाहीनता दिसताच माजी…

Read Full News

नारळावर साकारले रेणुका मातेचे सुंदर, मनमोहक रूप:चांदवडचे कलाकार केदारे यांचा कलाविष्कार‎

येथील प्रसिद्ध कलाकार किरण केदारे यांनी एका नारळावर रेणुका मातेची सुंदर व मनमोहक प्रतिकृती साकारली आहे. ॲक्रेलिक रंगांच्या साहाय्याने नारळाच्या छोट्याशा पृष्ठभागावर रेणुका देवीचे हुबेहूब रूप रेखाटण्यासाठी त्यांनी चार ते पाच तास अखंड मेहनत घेतली. या प्रतिकृतीने प्रत्येकाचे लक्ष वेधून घेतले. नारळाच्या मर्यादित आकारावर देवीचे रूप साकारताना अचूकता, रंगांचा योग्य वापर आणि सूक्ष्म निरीक्षण यांची…

Read Full News

दुष्काळी मदत, शेतकऱ्यांना हक्काच्या पट्ट्यांसाठी नांदगाव तहसीलवर मोर्चा:माकपचे तहसीलदारांना निवेदन; एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा‎

लोकशाहीचे रक्षण, विद्यार्थ्यांचे हक्क आणि दुष्काळग्रस्त शेतकरी-शेतमजुरांच्या प्रश्नांवर तातडीने तोडगा काढण्याच्या मागणीसाठी भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), अखिल भारतीय किसान सभा आणि ‘सिटू’ कामगार युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने नांदगाव तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आंदोलकांनी विविध मागण्यांचे सविस्तर निवेदन तहसीलदारांना सादर करत प्रशासनाने तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली. नांदगाव तालुक्यातील बिकट दुष्काळसदृश परिस्थितीकडे लक्ष वेधत शेतकऱ्यांना…

Read Full News