‘उद्धवजींनी बोलावलंच नाही, मी वाटच पाहत राहिलो’:2019 नंतर फोनच आला नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
“2019 पर्यंत उद्धवजींनी जेव्हा-जेव्हा फोन केला, तेव्हा मी आलो; पण 2019 नंतर त्यांनी बोलावलं नाही. मी वाटच पाहत राहिलो,” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मिश्कील टोला लगावला. मुंबईत व्यंगचित्रकारांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात फडणवीस बोलत होते. या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस यांच्यासह उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे…