वैजापूर शहरात डेअरीचा परवाना केला निलंबित:94 पैकी अवघे 15 गुण; 98 किलो पनीर नष्ट
शहरातील रामगिरीनगर येथील ‘नॅचरल डेअरी’वर अन्न व औषध प्रशासनाने अचानक धाड टाकल्यानंतर प्लँटमधील कारभाराची ‘पोलखोल’ झाली. अन्न सुरक्षेच्या निकषांवर झालेल्या तपासणीत ९४ पैकी अवघे १५ गुण मिळाल्याने डेअरीची स्थिती ‘नॉन-कॉम्प्लायन्स’ असल्याचे समोर आले. प्लँटमध्ये तुटलेली फरशी, उघडे दरवाजे, खिडक्यांना कीटक प्रतिबंधक जाळ्या नसणे, पिण्यायोग्य पाण्याचा चाचणी अहवाल उपलब्ध नसणे अशा एकामागून एक त्रुटी आढळल्या. एवढेच…