Headlines

आसामच्या जागीरॉड येथे देशाचा सर्वात मोठा सेमीकंडक्टर प्लांट:ट्रायल रन सुरू; दररोज बनतील 4.8 कोटी चिप; 40 हजार रोजगार निर्माण होणार

आसामच्या जागीरोड, मोरीगाव येथे उभारला जात असलेला टाटा समूहाचा सेमीकंडक्टर प्लांट हा देशातील सर्वात मोठा सेमीकंडक्टर प्लांट आहे. पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर या प्लांटची उत्पादन क्षमता दररोज सुमारे 4.8 कोटी सेमीकंडक्टर चिप्सपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. तब्बल 592 एकर परिसरात पसरलेल्या या प्लांटची ट्रायल रन सुरू झाले आहे. येथे वायर बॉन्डिंग, फ्लिप चिप आणि फॅन-आउट यांसारख्या प्रगत…

Read Full News

पेपर फुटी मागचा आका कोण हे तपासा : थोरात:पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा‎

पुण्यातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन हे देशभर गेले आहे. देशातील हजारो युवक यामध्ये सहभागी होणार आहेत. पेपर फुटतात कसे ? , आंदोलनाची वेळ का येते ? असा सवाल करताना या सरकारच्या हेतूबद्दल शंका असून पेपर फुटी मागचा आका कोण हे तपासा व त्याला पकडा, अशी मागणी काँग्रेस नेते व माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली….

Read Full News

चितेगाव येथे बोअरवेलला दूषित, दुर्गंधीयुक्त पाणी:केमिकल कंपन्यांच्या प्रदूषणामुळे आरोग्य धोक्यात‎

पैठण-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील चितेगाव येथील गांधीनगर आणि साईनगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून १०० हून अधिक बोअरवेलमधून दूषित, काळे व फेसयुक्त पाणी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. नळाला व बोअरवेलला येणाऱ्या या पाण्याला तीव्र दुर्गंधी येत असून, लहान मुले आणि वृद्धांच्या आरोग्याबाबत भीतीचे वातावरण पसरले आहे. पाण्याच्या गुणवत्तेबाबत तक्रारी वाढल्यानंतर ग्रामपंचायत व आरोग्य…

Read Full News

पिकांची अवस्था, पाणी उपलब्धता, आवश्यक सिंचनाबाबत शेतकऱ्यांनी मांडल्या समस्या:शंकरपूर, सिरेसायगाव परिसरात आमदार रमेश बोरनारे यांचा दुष्काळी पाहणी दौरा‎

गंगापूर तालुक्यातील शंकरपूर, सिरेसायगाव, गोपाळवाडी येथे वैजापूर-गंगापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेश बोरनारे यांनी दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी दौरा केला. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने परिसरातील शेती पिकांवर निर्माण झालेल्या संकटाची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी आ. बोरनारे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. पावसाअभावी खरीप हंगामातील पिकांची झालेली अवस्था, पाण्याची उपलब्धता, पिकांना आवश्यक असलेले…

Read Full News

दिल्ली ACP विवेक भगत यांना अतिरिक्त-DCP पदाचा पदभार देण्यास स्थगिती:महिला पत्रकाराशी गैरवर्तन केल्याचा ठपका; सरकार म्हणाले- ही पदोन्नती नाही

दिल्ली सरकारने ACP विवेक भगत यांना अतिरिक्त DCP पदाचा कार्यभार देण्याला स्थगिती दिली आहे. भगत यांच्यावर 3 ऑक्टोबर रोजी जंतर-मंतर येथे आंदोलनात एका महिला पत्रकाराचा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. त्यांच्याविरोधात FIR दाखल करण्याच्या मागणीसाठी गेल्या 3 दिवसांपासून पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन सुरू आहे. सरकारच्या माहितीनुसार, केंद्रशासित प्रदेशांतील 12 अधिकाऱ्यांना अतिरिक्त DCP चा करंट…

Read Full News

निर्धार:अवैध दारू विक्रीविरोधात वरखेडच्या ग्रामस्थांचा एल्गार; महिलांचा पुढाकार

गावात अवैधरीत्या सुरू असलेल्या दारूविक्रीमुळे सातत्याने भांडणे, वादविवाद आणि सामाजिक वातावरण बिघडत असल्याने अखेर वरखेड ग्रामस्थांनी एकजूट दाखवत अवैध दारूविक्रीविरोधात निर्णायक भूमिका घेतली आहे. दोन दिवसांपूर्वी गावातील एका तरुणाचा भांडणातून मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली असून गावातील सर्व अवैध दारूविक्रीची दुकाने बंद करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. यासाठी आज वरखेड येथील…

Read Full News

सहा दिवस उलटले; सोयगाव तालुक्यात 24,669 हेक्टरचे पंचनामे अद्याप बाकी:10 ऑक्टोबरपर्यंत पंचनामे पूर्ण करण्याचे तालुका कृषी विभागाचे आश्वासन‎

तालुक्यातील दुष्काळग्रस्त चारही महसूल मंडळांमध्ये गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या खरीप पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांना आता गती आली आहे. मात्र, तालुक्यातील ८७ महसुली गावांमधील एकूण ४२ हजार ६६९ हेक्टर क्षेत्रापैकी सुमारे १८ हजार हेक्टर क्षेत्राचेच पंचनामे पूर्ण झाले असून अद्याप २४ हजार ६६९ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे बाकी आहेत. उर्वरित पंचनामे कधी पूर्ण होणार याकडे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे…

Read Full News

नवरात्रोत्सवात डीजेचा खर्च टाळत कृषीनगरात 16 सीसीटीव्ही:लासलगावच्या कृषीनगर मित्र मंडळाकडून देणगीतून एक किलोमीटर परिसरावर राहणार नजर‎

सण-उत्सवात डीजे व बँडसाठी जवळपास दीड लाख रुपयांपर्यंत खर्च केला जातो. मात्र ध्वनिप्रदूषणाचे गंभीर परिणाम लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक व आजारी व्यक्तींवर होत आहेत. या पार्श्वभूमीवर लासलगाव येथील कृषीनगर मित्र मंडळाने नवरात्रोत्सवात डीजेवरील अनावश्यक खर्च टाळून परिसराच्या सुरक्षेसाठी एक किमी परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला आहे. कृषीनगर परिसरातील प्रमुख मार्ग व संवेदनशील ठिकाणी…

Read Full News

बंगाल, आसाम, तामिळनाडू, पुद्दुचेरीच्या 6 जागांवर मतदान:यात नंदीग्रामचाही समावेश; 15 वर्षांत प्रथमच ममता ना CM, आमदार, ना उमेदवार

देशातील चार राज्यांमध्ये—पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी—आज 6 जागांवर पोटनिवडणुका होत आहेत. मतदान सकाळी 7 वाजता सुरू झाले आहे. यामध्ये पश्चिम बंगालमधील नंदीग्राम आणि रेजीनगर, तामिळनाडूमधील मदुरंथकम आणि धारापूरम, पुद्दुचेरीमधील थट्टांचावडी विधानसभा मतदारसंघ आणि आसाममधील नौगाव लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. सर्व जागांचे निकाल 9 ऑक्टोबर रोजी जाहीर होतील. सर्वाधिक लक्ष पश्चिम बंगालकडे आहे. येथे…

Read Full News

चांदवडचा इतिहास बॅनरच्या आड:सोमवार पेठ वेशीवर जाहिराती; खिळ्यांमुळे दगडी बांधकामाची झीज‎

येथील होळकरकालीन वैभवाचा साक्षीदार असलेल्या सोमवार पेठेतील ऐतिहासिक वेशीवर मोठ्या प्रमाणात राजकीय व सामाजिक जाहिरातींची बॅनरबाजी केली जात आहे. बॅनर लावण्यासाठी वेशीच्या दगडांमध्ये खिळे ठोकले जात असल्याने दगड खराब होत असून, वेशीवरील अठराव्या शतकातील दुर्मिळ फारसी शिलालेखाचेही अस्तित्व धोक्यात आले आहे. ऐतिहासिक वारशाचे नुकसान होण्यापूर्वी पुरातत्त्व विभाग व स्थानिक प्रशासनाने वेशीचे तातडीने संवर्धन करावे, अशी…

Read Full News