Headlines

Nifty Sensex Market Crash | Auto Media Stocks Sell-off Trading Update

16 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक शेअर बाजारात आज म्हणजेच 1 ऑक्टोबरला घसरण झाली आहे. सेन्सेक्स 150 अंकांनी घसरून 72,300च्या पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्ये 30 अंकांची घसरण झाली असून तो 22,600च्या पातळीवर आहे. ऑटो आणि मीडिया शेअर्समध्ये सर्वाधिक विक्री होत आहे. मनीव्ह्यूचा शेअर 62% वाढून ₹55 वर सूचीबद्ध डिजिटल लेंडिंग प्लॅटफॉर्म मनीव्ह्यूचे शेअर्स ₹34च्या इश्यू किमतीच्या…

Read Full News

दिव्य मराठी एक्स्पाेज:आधार नोंदणी, अपडेशनमध्ये तब्बल 54.68 कोटींची नियमबाह्य वसुली, डिपॉझिटच्या नावाखाली ऑपरेटर्सची लूट

शालेय आणि अंगणवाडीतील विद्यार्थ्यांचे नवीन आधार कार्ड काढणे, बायोमेट्रिक अद्ययावतीकरण करण्यासाठी शालेय शिक्षण आणि महिला व बालविकास विभागामार्फत ‘आयटीआय लिमिटेड’ या कंपनीची २८ नोव्हेंबर २०२२ रोजी नियुक्ती केली होती. मात्र, या कामासाठी नेमलेल्या कंत्राटदाराने आधार ऑपरेटर्सकडून सिक्युरिटी डिपॉझिट, पेनल्टी आणि आधार ऑपरेटर्सच्या नियुक्त्यांसाठी तब्बल ५४ कोटी ६८ लाख रुपये नियमबाह्यपणे वसूल केल्याचे समोर आले आहे….

Read Full News

मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांभोवती फास आवळला:आयकरनंतर आता थेट 'ED'ची एन्ट्री; आंदोलनाचा खर्च, सरकारी कंत्राटं अन् जमीन व्यवहारांची होणार गुप्त चौकशी

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सातत्याने आक्रमक पवित्रा घेत राज्य सरकारला अडचणीत आणणारे आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांच्या निकटवर्तीयांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ होण्याची चिन्हे आहेत. आंतरवाली सराटीतील उपोषण आणि मुंबईच्या दिशेने निघालेल्या मोर्चादरम्यान तब्येत बिघडल्याने जरांगे यांनी आंदोलन स्थगित केल्यानंतर, त्यांच्या अनेक सहकाऱ्यांमागे आयकर विभागाचा (IT) ससेमिरा लागला होता. आता या प्रकरणात थेट केंद्रीय तपास यंत्रणा…

Read Full News

दिव्य मराठी ब्रेकिंग‎:हर्सूल जेलमध्ये ट्रान्सजेंडरसाठी स्वतंत्र बराक; 100 क्षमतेचे खुले कारागृह, 12 कोटी रुपयांतून उभारणीचे काम सुरू

छत्रपती संभाजीनगर येथील हर्सूल मध्यवर्ती कारागृहात आता तृतीयपंथी (ट्रान्सजेंडर) कैद्यांसाठी स्वतंत्र दुमजली बराक उभारण्यात येत आहे. नागपूरनंतर मराठवाड्यात होणारा हा पहिलाच प्रयोग आहे. यासोबतच चांगल्या वर्तणुकीच्या कैद्यांसाठी तब्बल १०० क्षमतेचे ‘ओपन जेल’ (खुले कारागृह) देखील साकारले जात असून या १२ कोटी १२ लाख रुपयांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या प्रत्यक्ष बांधकामाला वेगाने सुरुवात झाली आहे. हर्सूल मध्यवर्ती कारागृहाचा…

Read Full News

विधानपरिषद सभापतींना कायदे-नियम माहीत नसतील तर काय बोलावं?:राम शिंदेंना सभापती पदावरून हटवून उत्सव मंडळात पाठवावे- रोहित पवार

तीन अपत्ये असतानाही राम शिंदे निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसल्याचा दावा करत पवार यांनी त्यांना कायद्याचे नियमच ठाऊक नाहीत, त्यांची बौद्धिक क्षमता मला माहित्येय पण यानिमित्ताने राज्यात पडलेल्या दुष्काळासोबतच घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीच्या आणि त्यांच्या कार्यालयाच्या बौद्धिक दुष्काळाचंही त्यांनी महाराष्ट्राला दर्शन घडवलं, असा टोला आमदार रोहित पवार यांनी अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून विधानपरिषदेचे सभापती प्रा….

Read Full News

विरोधकांच्या टीकेला कृषिमंत्र्यांचे आकडेवारीतून उत्तर!:कर्जमाफीचे 13,500 कोटी खात्यात जमा, दुष्काळग्रस्तांनाही तातडीने मदत देणार- भरणे

एल निनोच्या संकटामुळे आणि पावसाने ओढ दिल्याने राज्यातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला असून, आजपासून पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. “आम्हीही शेतकऱ्यांचीच मुले आहोत, अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही आणि त्यांना भरीव मदत देऊ,” अशी घोषणा राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे…

Read Full News

बनावट सीएसआर देणग्यांचे सिंडिकेट उद्ध्वस्त:मुंबई आणि 3 राज्यांत ईडीचे छापे, डॉ. धर्मेंद्र कुमारच्या रॅकेटवर टाच; महाराष्ट्र, बंगाल, गुजरात, दिल्लीत कारवाई

सामाजिक दायित्व निधीच्या (सीएसआर) नावाखाली सुरू असलेल्या आंतरराज्य आर्थिक गैरव्यवहाराचा अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पर्दाफाश केला. बनावट वैद्यकीय कागदपत्रांच्या आधारे कॉर्पोरेट कंपन्यांचा सीएसआर निधी लाटून तो पुन्हा देणगीदारांपर्यंत फिरवणाऱ्या रॅके . यात महाराष्ट्रातील ५ व ३ राज्यांतील ८ ठिकाणांवर छापे टाकले. या साखळीचा मुख्य सूत्रधार डॉ. धर्मेंद्र कुमार हा आहे. कायद्यानुसार बड्या कॉर्पोरेट कंपन्यांना नफ्यातील २…

Read Full News

कुणबी जात वैधतेच्या जुन्या आदेशांना आव्हान नाही- कोर्ट:पडताळणी समितीच्या आदेशावर खंडपीठाचा निर्वाळा

जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने १० ऑगस्ट २०२६ पूर्वी दिलेले अवैधतेचे आदेश विभागीय आयुक्तांकडे अपिलात आव्हानित करता येणार नाहीत, असा महत्त्वाचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. न्या. किशोर सी. संत आणि न्या. जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांना विभागीय आयुक्तांकडे दाद मागण्याची मुभा मागणारी याचिका मागे घेण्यास नकार दिला. यामुळे जुन्या प्रकरणांमधील याचिका वर्ग…

Read Full News

इगतपुरीत 46 मतदारांची सुनावणी पूर्ण:मतदार यादीतील नोंदींच्या दुरुस्तीसाठी नगरपरिषद कार्यालयात प्रक्रिया‎

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रमांतर्गत शहरातील मतदारांच्या नावांमध्ये अथवा मतदार यादीतील नोंदींमध्ये दुरुस्ती आवश्यक असल्याने संबंधित मतदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या नोटिसांच्या अनुषंगाने सोमवारी (दि. २८) इगतपुरी नगरपरिषद कार्यालयात सुनावणी घेण्यात आली. इगतपुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी किशोर चव्हाण यांच्या उपस्थितीत एकूण ९२ मतदारांपैकी ४६ मतदारांची…

Read Full News

बाजार समितीच्या विकासासाठी13 कोटींचा प्रस्ताव:वार्षिक सभेत सभापती नितीन आहेर यांची माहिती; आवारात शेतमालाची आवक वाढविण्यासाठीचे नियाेजन‎

बाजार समितीच्या मुख्य व उपबाजार आवारांमध्ये शेतकऱ्यांसाठी मूलभूत व पायाभूत सुविधा उभारण्यासाठी १३ कोटी रुपयांच्या अनुदानाचा प्रस्ताव कृषी पणन मंडळाकडे सादर करण्यात आला आहे. मुख्य बाजार आवारासाठी ८ कोटी आणि उपबाजार आवारासाठी ५ कोटी रुपयांचा निधी प्रस् . बाजार समितीची १९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी (दि. ३०) सभापती नितीन आहेर यांच्या अध्यक्षतेखाली बाजार समितीच्या…

Read Full News