जेलमध्ये 32 फोन, 20 कॉलिंग कार्ड्स अन् VIP सुविधा:वाल्मिक कराडला प्रशासनाचा पाठिंबा असल्याचा खासदार बजरंग सोनवणेंचा खळबळजनक आरोप
तुरुंगात शिक्षा भोगत असलेला वाल्मिक कराड कारागृहातून राजरोसपणे आपले नेटवर्क चालवत असल्याचा अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. वाल्मिक कराड कारागृहात तब्बल 32 फोन वापरत असल्याचे आणि 20 कॉलिंग कार्ड्सच्या माध्यमातून बाहेरील व्यक्तींशी नियमित संपर्कात असल्याचे चौकशीत उघड झाले असूनही प्रशासन मूळ सूत्रधारांना सोडून लहान कर्मचाऱ्यांवर कारवाईचा…