Headlines

पाऊस लांबल्याने फुलंब्री तालुक्यातील भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात:तालुक्यात केवळ 18 हेक्टरवरच कपाशीची लागवड‎

दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महागडे बियाणे खरेदी करून, उन्हाचा चटका सोसत भाजीपाल्याची लागवड करायची आणि पुढे बाजारात चांगला भाव मिळवून सुगीचे दिवस पाहायचे, या आशेने फुलंब्री तालुक्यातील शेतकरी दरवर्षी भाजीपाल्याची लागवड करतात. मात्र, यावर्षी पावसाने मारलेली प्रदीर्घ दडी आणि निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांचा हा अंदाज पूर्णपणे अंगलट आला असून तालुक्यातील भाजीपाला उत्पादक शेतकरी भीषण संकटात…

Read More

मुलीच्या लग्नासाठीची एफडी बँकेने परस्पर पीक कर्जात वळवली‎:24 जून रोजी लग्न असल्याने बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी गेल्यावर आला प्रकार उघडकीस‎

मुलीच्या लग्नासाठी शेतकऱ्याने कष्टाने जमा केलेले फिक्स डिपॉझिटचे (एफडी) पैसे बँकेने कोणतीही पूर्वकल्पना न देता परस्पर पीककर्ज खात्यात वर्ग केल्याचा प्रकार सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या लासूर स्टेशन शाखेत उघडकीस आला. २४ जून रोजी मुलीचे लग्न असल्याने शेतकर . राऊत यांनी शेतीसाठी २०१९ मध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या लासूर स्टेशन शाखेतून ८० हजारांचे पीककर्ज घेतले होते,…

Read More

लोणी खुर्द येथे शिव रस्ता मोकळा करण्यासाठी उपोषण:तहसीलदारांच्या आश्वासनानंतर उपोषण स्थगित‎

वैजापुर तालुक्यातील तलवाडा, बाभुळतेल, लोणी खुर्द येथील शिव रस्ता मोकळा करून नागरिकांना वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा, या मागणीसाठी गोकुळ मगर व शेतकरी महिलांच्या वतीने करण्यात आलेले उपोषण तहसीलदार सुनील सावंत यांच्या सकारात्मक आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून संबंधित रस्त्यावरील अतिक्रमण व अडथळ्यांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत होता. याबाबत प्रशासनाचे लक्ष…

Read More

संभाजीनगरात ‘एफएसएसएआय’चे नामांकित हॉटेल्स, मॉल्सवर छापे:पथक 2 दिवसांपासून मुक्कामी, अन्नपदार्थांचे नमुने जप्त

केंद्र सरकारच्या भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या (एफएसएसएआय) विशेष पथकाने शहरात अचानक धडक मारली आहे. गेल्या दोन दिवसांपासून या पथकाने शहरातील नामांकित हॉटेल्स आणि प्रमुख मॉल्समध्ये छापे टाकून अन्नपदार्थांच्या गुणवत्तेची तपासणी सुरू केली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे. कारवाईदरम्यान पथकाने थेट हॉटेल्सच्या स्वयंपाकघरात जाऊन अन्नपदार्थ, स्वच्छता आणि…

Read More

प्रदीप कुरुलकरविरुद्ध दोषारोप झाले निश्चित:जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुनावणीस सुरुवात

पाकिस्तानी गुप्तहेर महिलेला देशाची गोपनीय माहिती पाठवल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला संरक्षण, संशोधन व विकास संस्थेचा माजी संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर याच्याविरुद्ध ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट, १९२३ अंतर्गत दोषारोप निश्चित करण्यात आले. त्यामुळे खटला सुनावणीला सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला असून जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुनावणीला सुरुवात होणार आहे. “हनी ट्रॅप’मध्ये अडकून झारा दासगुप्ता नावाच्या पाकिस्तानी महिला हेरास…

Read More

निवृत्त एसीपीवर सुनेचा छळ, शारीरिक संबंधांची मागणी:पती, सासू, नणंदांसह सात जणांवर गुन्हा दाखल; कोंढवा पोलिसांकडून तपास

पुण्यात एका निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्तावर (एसीपी) सुनेचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा तसेच तिच्याकडे शारीरिक संबंधांची मागणी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पती, सासू आणि नणंदांसह सात जणांविरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात ३० वर्षीय विवाहितेने यासंदर्भात फिर्याद दिली आहे. निवृत्त एसीपी सुरेश…

Read More

मंत्री गोरे यांनी आषाढीवारी तयारीचा घेतला आढावा:पालखी सोहळा सर्वोत्कृष्ट करण्यासाठी समन्वयाने काम करण्याचे आवाहन

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आगामी आषाढीवारीच्या तयारीचा आढावा घेतला. विधानभवनात झालेल्या बैठकीत त्यांनी सर्व यंत्रणांना समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले, जेणेकरून पालखी सोहळा उत्कृष्ट पद्धतीने पार पडेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार, एकाही वारकऱ्याला असुविधा होऊ नये, यावर त्यांनी भर दिला. या आढावा बैठकीला ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, विभागीय…

Read More

आमदार निवासात पाण्याची टंचाई:कॅन्टीनमध्ये कागदी प्लेट्स वापरण्याची वेळ; विजय वडेट्टीवारांनी पाणीटंचाईवरून सरकारला घेरले

महाराष्ट्रात सध्या पाणीटंचाईचे भीषण संकट गडद होत चालले असून, विरोधकांनी यावरून सत्ताधारी महायुती सरकारला धारेवर धरले आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावरून सरकारवर अत्यंत बोचरी टीका केली आहे. “संपूर्ण राज्य दुष्काळाच्या छायेत होरपळत असताना, महायुती सरकार मात्र केवळ आमदार आणि खासदार फोडण्याच्या राजकारणात मग्न आहे,” असा थेट आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे….

Read More

तुम्ही स्वतःला निर्लज्जपणे विकले!:महाराष्ट्र हे घाणेरडे राजकारण सहन करणार नाही, फुटलेल्या खासदारांवर आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

शिवसेना ठाकरे गट पुन्हा एकदा मोठ्या फुटीच्या उंबरठ्यावर असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने राबवलेल्या ‘ऑपरेशन टायगर’मुळे ठाकरे गटाचे 6 खासदार फुटल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या संभाव्य बंडाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून अधिकृत व्हिप जारी करण्यात आला होता. मात्र असे असूनही या 6 पैकी एकाही खासदाराने पक्षाच्या संसदीय दलाच्या बैठकीला हजेरी लावली नाही. बैठकीकडे…

Read More

तहानलेल्या ठाण्याचं पाणी 'ॲमेझॉन'च्या घशात!:मेगा डेटा सेंटरवरून जितेंद्र आव्हाडांचा पालिकेवर हल्लाबोल, टीडीआरनंतर आता नवा घोळ?

ठाणे महानगरपालिकेमध्ये सध्या गाजत असलेल्या टीडीआर घोटाळ्यावरून आधीच वनविभागासह पालिकेवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. यातच आता पालिकेच्या आणखी एका नव्या आणि वादग्रस्त निर्णयाची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी असा खळबळजनक आरोप केला आहे की, अमेरिका आणि युरोपमधील काही देशांनी हद्दपार केलेला ‘ॲमेझॉन’चा मेगा डेटा सेंटर प्रकल्प…

Read More