Headlines

पालकमंत्र्यांकडून याद्याच न मिळाल्याने हिंगोलीत 338 कोटींचे नियोजन रखडले:मार्चअखेर निधी खर्चाचे प्रशासनासमोर आव्हान

हिंगोली जिल्ह्यात जिल्हा वार्षिक योजनेत पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडून प्रशासकीय मान्यतेबाबत याद्याच प्राप्त झाल्या नसल्याने योजनेसाठी मिळलेल्या तब्बल 338 कोटी रुपयांच्या विकास कामांचे नियोजन रखडले आहेत. नियोजनाला उशीर होत असल्याने मार्च अखेरपर्यंत निधी खर्च करण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे राहणार आहे. हिंगोली जिल्ह्यात विकास कामांसाठी शासनाच्या नियोजन विभागाकडून 338 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. यामध्ये…

Read More

'त्वचादानासाठी देशात सक्षम यंत्रणा उभारा':खासदार विनोद तावडेंची राज्यसभेत आग्रही मागणी; 'नोटो'अंतर्गत स्किन बँक्स वाढवण्याचे आवाहन

गंभीररीत्या भाजलेल्या रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी देशात त्वचादान आणि ‘स्किन बँकिंग’ची व्यवस्था अधिक मजबूत करण्याची अत्यंत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस व राज्यसभा खासदार विनोद तावडे यांनी आज राज्यसभेत केले. या संवेदनशील मुद्द्याकडे सरकारचे लक्ष वेधताना त्यांनी संपूर्ण देशभरात त्वचादानासाठी व्यापक यंत्रणा उभारण्याची मागणी केली. तसेच ‘नोटो’ (NOTTO) अंतर्गत देशभरात स्किन बँक्सची स्थापना, कोल्ड-चेन नेटवर्कची…

Read More

महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे संकट!:20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी वाऱ्यासह गारपीटीचा अंदाज, CMO कडून सतर्कतेचा इशारा

महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये मागील काही आठवड्यात अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान देखील झाले. त्यानंतर पुन्हा कडक उन्ह तसेच गर्मीत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. उन्ह इतके वाढले की अकोल्यात उष्माघातामुळे एका रिक्षा चलकाचा मृत्यू झाल्याची देखील माहिती समोर आली होती. मात्र, आता पुन्हा राज्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात…

Read More

दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात:नेवासेतील ज्ञानेश्वर कॉलनीत समस्यांचा विळखा, नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात‎

पावसाळापूर्व कामांकडे नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे ज्ञानेश्वर कॉलनीतील शेकडो नागरिकांचे जीवन सध्या सांडपाण्याच्या संकटात सापडले आहे. साचलेल्या पाण्यामुळे बोअरवेल दूषित झाल्याचा आरोप, फुटलेल्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा दूषित होत असल्याची भीती आणि अतिवृष्टीत पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. बसस्थानक, पोलीस लाईन व गंगानगर भागातील सांडपाणी तसेच पावसाचे पाणी वाहून नेणारा नैसर्गिक…

Read More

Actor Saurabh Gokhale Statement On CJP Delhi Protest

‘नीट’ परीक्षा पेपरफुटी प्रकरण आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टी (CJP)कडून दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनावरून देशभरात तीव्र राजकीय आणि सामाजिक प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक कलाकार . दिल्लीतील आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. या घटनेनंतर अनेक सेलिब्रिटींनी विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवत पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला….

Read More

कन्नडमधील मूलभूत सुविधांना गती- आमदार जाधव:प्रभागांमध्ये विकासकामांचे लोकार्पण, सर्वांना सोबत घेऊन विकासकामे करणार‎

यापूर्वी आमदार व नगराध्यक्ष वेगवेगळ्या पक्षाचे व विरोधात होते. आमदारांनी मंजूर करून आणलेल्या विकास कामांना पालिका ना हरकत प्रमाणपत्र देत नव्हती. त्यामुळे विकास खुंटला. आता नगराध्यक्ष व आमदार वेगवेगळ्या पक्षाचे पण एका विचारांचे असल्याने शहराच्या विकासाला गती आली आहे, असे प्रतिपादन आमदार संजना जाधव यांनी केले. कन्नड शहरातील प्रभाग क्रमांक १, ५, ६ व ९…

Read More

चांदवडमध्ये भरपावसात आंदोलन:घोषणाबाजी करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी‎

नीट पेपरफुटीप्रकरणी नवी दिल्ली येथील जंतरमंतरवर शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ तसेच विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ गुरुवारी (दि. २३) चांदवड येथे प्रमुख विरोधी समविचारी पक्ष, संघटना, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत पोलिस निरीक्षक कैलास वाघ यांना निवेदन दिले. यावेळी घोषणाबाजी करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या…

Read More

आरक्षणाची सवलत घेणाऱ्यांना आता खुल्या प्रवर्गाचे दरवाजे बंद:महाराष्ट्र सरकारकडून आरक्षणाचे नवीन धोरण जाहीर; भरती प्रक्रियेत होणार बदल

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारी नोकरीतील आरक्षणासंदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, ज्या उमेदवारांनी आरक्षणाची सवलत घेतली आहे, त्यांना आता खुल्या प्रवर्गातील जागांवर दावा सांगता येणार नाही. केंद्र सरकार आणि गुजरात राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही हे आरक्षणाचे नवे धोरण निश्चित केले असून, या निर्णयामुळे राज्य सरकारी नोकरभरतीच्या प्रक्रियेत मोठे बदल होणार आहेत. राज्य सरकारने…

Read More

घनकचरा व्यवस्थापनाच्या कंत्राट प्रकरणात कोट्यवधींची अनियमितता:चांदवड येथे पत्रकार परिषदेत शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरींचा आरोप‎

नगरपरिषदेच्या ‘बायो-मायनिंग व घनकचरा व्यवस्थापन’ कंत्राटात १५ ते २० कोटी रुपयांच्या कथित आर्थिक अनियमितता व भ्रष्टाचाराची स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याप्रकरणी अहवाल मागवून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नगरविकास विभाग व संबंधित यंत्रणेला दिल्याची माहिती शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली….

Read More

PM म्हणाले- बंगाल बदलासाठी तयार:TMC च्या भयभीत राजवटीला हटवणार; आसाममधील एका मतदान केंद्रावर आज पुन्हा मतदान

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगालमध्ये आहेत. त्यांनी पुरवा वर्धमान जिल्ह्यातील कटवा येथील निवडणूक रॅलीत सांगितले की, बंगाल बदलासाठी तयार आहे. येथील महान वारशावर टीएमसीने असे पाप केले आहे की, त्यावर मागासलेपणाचा डाग लावला आहे. पंतप्रधानांनी सांगितले की, आता भाजपने संकल्प केला आहे की, ते बंगालला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जातील. कालच जाहीरनामा प्रसिद्ध केला,…

Read More