Headlines

दिलासादायक:अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 44,648 शेतकऱ्यांना मिळणार लाभ

महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी २ जून २०२६ रोजी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६’ ची ऐतिहासिक घोषणा केली आहे. या शासन निर्णयाच्या आधारे लातूर जिल्ह्यातील तब्बल ४४,६४८ पात्र शेतकरी बांधवांना कर्जमुक्ती आणि अर्थसहाय्याचा थेट लाभ मिळणार आहे. मात्र, जो शेतकरी योजनेच्या निकषात बसत नाही त्याला शासन स्तरावरून कमी करण्यात येणार आहे. जिल्हा…

Read More

दिल्ली लाठीहल्ला निषेधार्थ कँडल मार्च:आ. अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन‎

जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या तरुणांवर झालेल्या कथित अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी (दि.२४) सायंकाळी लातूर शहरात कॅंडल मार्च काढून निषेध नोंदवण्यात आला. काँग्रेसचे माजी मंत्री तथा आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हा कॅंडल मार्च काढण्यात आला, यावेळी आमदार देशमुख यांच्या पत्नी अदिती देशमुख याही या मार्चमध्ये सहभागी झाल्या होत्या. लातूर शहरातील नीट पेपरफुटी प्रकरणातील…

Read More

आजाराचा फैलाव:तपासणीनंतर शहरात डेंग्यूचे 60 चिकुनगुन्याचे 33 रुग्ण आढळले

शहरात जानेवारी ते जून या सहा महिन्यांत ६५५ संशयित रुग्णांचे रक्तनमुने तपासण्यात आले असून त्यापैकी ६० रुग्ण डेंग्यू तर ३३ रुग्ण िचकुनगुन्याने बाधित असल्याचे निष्पन्न झाले. शहरात ९३ डासजन्य रुग्णांची नोंद झाली आहे. आगामी काळात रुग्णसंख्या वाढू नये यासाठी महानगरपालिकेच्या मलेरिया विभागाने २० प्रभागांमध्ये प्रत्येकी कर्मचारी नियुक्त करून फवारणी सुरू केली आहे. पावसाळ्यात एडिस डासांची…

Read More

श्रावण मेळ्याच्या आयोजनातून‎ दिव्यांगांना मिळणार रोजगार‎:अग्रसेन भवनात आज, उद्या मेळाव्याचे आयोजन‎

अग्रवाल जागृती महिला मंडळ, अग्रवाल सखी मंच आणि दिव्यांग सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने २५ व २६ जुलै रोजी अग्रसेन भवनात श्रावण मेळा आयोजित करण्यात आला आहे. दिव्यांगांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे हे या मेळ्याचे मुख्य वैशिष्ट्य आहे. मेळ्यात दिव्यांग सोशल फाउंडेशनचे विशेष ‘कलादालन’अकोलेकरांसा ठी उपलब्ध असणार आहे. यात दिव्यांगांनी स्वतः तयार केलेल्या आकर्षक…

Read More

घट्ट पँट घातल्याने राज्यपालांची उचलबांगडी:AI ने केस जिंकली, 52 लाख मिळाले; मुलांची नावे Canon-Nikon, घरही कॅमेऱ्यासारखे

तुर्कस्तानात एका गव्हर्नरला घट्ट पँट घातल्यामुळे पदावरून हटवण्यात आले. तर, कर्नाटकात एका छायाचित्रकाराने आपल्या मुलांची नावे कॅमेरा ब्रँड्सवर ठेवली. तिकडे, ब्रिटनमध्ये एका व्यक्तीने AI च्या मदतीने आपल्या एक्स गर्लफ्रेंडविरुद्ध सुमारे ₹54 लाखांचा खटला जिंकला. आफ्रिकेत एलियनसारखा दिसणारा एक कीटक सापडला आहे, ज्याला लोक मोठ्या आवडीने खातात. तर, ट्रॅफिक सिग्नलवर एक व्यक्ती बाईकवर बसून लॅपटॉप उघडून…

Read More

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा अकोटमध्ये काँग्रेसकडून निषेध:राजीनाम्याची मागणी

नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ दिल्ली येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या घटनेचा अकोट शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात घोषणाबाजी केली. विद्यार्थ्यांच्या लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनावर बलप्रयोग करण्यात आल्याचा निषेध व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी…

Read More

दुर्मिळ अजगराला जीवनदान:अमानतपूर येथे सर्पमित्रांनी 25 फूट खोल विहिरीतून काढला नऊ फुटांचा अजगर

शहरापासून जवळच असलेल्या अमानतपूर येथील शेतकरी विनोद मुरूमकार यांच्या २५ फूट खोल विहिरीत पडलेल्या सुमारे ९ ते १० फूट लांबीच्या अजगराला सर्पमित्रांनी धाडसी मोहीम राबवून सुखरूप बाहेर काढले. सर्पमित्रांच्या तत्परतेमुळे दुर्मिळ अजगराला जीवनदान मिळाले आहे. अमानतपूर येथील विनोद मुरूमकार यांच्या शेतातील २५ फूट खोल विहिरीत मोठा अजगर पडल्याचे गावातील प्रज्ज्वल वाघ, सर्वेश वानखडे यांच्या निदर्शनास…

Read More

अवघा रंग एक झाला!:राज्यभरात आषाढी एकादशीचा भक्तीमय उत्साह, पंढरीत भाविकांचा महासागर

आषाढी एकादशीनिमित्त आज सकाळपासूनच राज्यभरात आनंदाचे आणि भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे. आज पहाटे पंढरपुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठूरायाची शासकीय महापूजा पार पडली. यावेळी त्यांनी ‘राज्यात चांगला पाऊस पडून पीक बहरू दे आणि महाराष्ट्र समृद्ध होऊ दे,’ अशी प्रार्थना पांडुरंगाचरणी केली. राज्याच्या इतर भागांतही आषाढीचा मोठा उत्साह दिसून येत असून विठुरायाच्या दर्शनासाठी मंदिरांमध्ये भाविकांची मोठी मांदियाळी…

Read More

‘कृषी वनीकरणा’तून शेतकऱ्यांचे उत्पन्न, अन्नसुरक्षेची निश्चिती:डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात 5 एकरात साकारतेय 5 कृषी वनीकरण मॉडेल्स‎

कृषी वनीकरणाचा दीर्घ २५ ते ३० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव पणाला लावत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील वनविज्ञान विभागातील प्रा. हर्षवर्धन देशमुख यांनी कुलगुरू डॉ. शरद गडाख, डॉ. एस. एस. हरणे, सहयोगी अधिष्ठाता डी. एम. पंचभाई, संशोधन संचालक एस. एस. माने यांच्या मार्गदर्शनात अल्पभूधारक व लहान शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारी प्रकल्प साकारला जात आहे. विद्यापीठाच्या परिसरात पाच एकरांवर…

Read More

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह‎:रूट निश्चितीमध्ये तांत्रिक अडचण; बेलोऱ्याहून ‘नाइट लॅंडिंग’ रखडले

बेलोरा विमानतळावरून रात्रीचे लॅंडिंग व टेकऑफ ‘रूट’ निश्चिती करण्यात तांत्रिक अडचण असल्याने रखडले आहे. रात्री विमानोड्डाणासाठी बेलोरा विमानतळासाठी नेमकी कोणत्या मार्गाने विमानसेवा द्यावी, यासाठी आपल्याकडे कोणते विमान उपलब्ध आहे. याबाबत एअर इंडियाने डीजीसीएला कळवले आहे. तसेच रात्री थेट मुंबई ते बेलोरा व बेलोरा ते मुंबई विमानसेवा देण्यात ज्या तांत्रिक अडचणी आहेत, त्याबाबतही माहिती दिली आहे….

Read More