Headlines

परभणीत बोकड देतोय अर्धा लिटर दूध:परिसरातील शेतकरी, पशुपालकांत कुतूहल, बोकडाला पाहण्यासाठी होतेय गर्दी‎

गंगाखेड तालुक्यातील गौंडगाव येथे निसर्गाचा चमत्कार पाहायला मिळत आहे. येथील गोविंद कुकडे यांच्या मालकीचा बोकड दूध देत असल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ही दुर्मिळ घटना पाहण्यासाठी परिसरातील नागरिक, शेतकरी व पशुपालक मोठ्या संख्येने गौंडगाव येथे भेट देत आहेत. दीड वर्षे वयाचा हा बोकड दररोज अर्धा लिटर दूध देतो. गौंडगाव येथील कुकडे यांचा दूध…

Read More

मानवी साखळी अन् मार्च काढून दिल्लीतील लाठीमाराचा निषेध:केंद्रीय शिक्षणमंत्री‎ धर्मेंद्र प्रधान यांच्या‎राजीनाम्याची मागणी

दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन‎करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या‎पोलिसांकडून झालेल्या लाठीमाराचे‎पडसाद शुक्रवारी अहिल्यानगरात उमटले. ‎‎शहरातील वर्दळीच्या दिल्लीगेट परिसरात ‎‎विद्यार्थी आणि विविध सामाजिक‎संघटनांचे कार्यकर्ते एकवटले. वाहतुकीला ‎‎अडथळा होऊ नये, याची काळजी घेत ‎‎विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या एका बाजूला मानवी ‎‎साखळी तयार करत शांततेच्या मार्गाने‎निषेध नोंदवला. हातात मागण्यांचे फलक ‎‎आणि घोषणांची पोस्टर घेऊन उभ्या‎असलेल्या विद्यार्थ्यांच्या लांबच लांब रांगेने‎नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.‎ दिल्लीत जंतर-मंतर…

Read More

Airline Economy Class Seat Pitch Reduction; Comfort Crisis For Passengers

नवी दिल्ली21 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक एव्हिएशन इंडस्ट्रीच्या अनेक रिपोर्ट्स आणि एअरलाईन्सच्या सीट मॅपच्या विश्लेषणानुसार, 1980-90 च्या दशकात इकोनॉमी क्लासमध्ये सीटमधील अंतर (सीट पिच) 34-35 इंच असायचे. आज बहुतेक एअरलाईन्समध्ये हे 30-31 इंच राहिले आहे. भारतात लो-कॉस्ट एअरलाईन्समध्ये हे अंतर 28-29 इंच आहे. गेल्या चार-पाच दशकांत जगभरातील एअरलाईन्सनी सीटची जागा सातत्याने कमी केली आहे, तर याच…

Read More

‘डिजिटल वारी’चा उत्साह, तरुणाईसह लहानांत क्रेझ:सोशल मीडियावर तुळशीमाळ अन् धोती-कुर्ता अन् नऊवारीला पसंती

यंदा आषाढी एकादशीचा उत्साह केवळ विठ्ठल मंदिरांपुरता मर्यादित न राहता, सोशल मीडियाच्या ‘डिजिटल विश्वात’ही मोठ्या उत्साहात पाहायला मिळत आहे. भक्तिमय वातावरणात पारंपरिक पोशाख परिधान करून सोशल मिडियावर ‘डिजिटल वारी’ साजरी करण्याकडे तरुणाईसह लहानांचा मोठा कल दिसून येत आहे. सोशल मिडियावर पारंपरिक पोशाखातील फोटो, आकर्षक रील्स आणि व्हिडियो अपलोड करून ‘विठू नामाचा’ गजर करण्याची नवी शैली…

Read More

कर्जमाफी यादी:कर्जमाफीच्या 1378 गावनिहाय याद्या आज होणार प्रसिद्ध

लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी करून फार्मर आयडी तयार करणे आणि त्यानंतर बायोमेट्रिक पद्धतीने आधार प्रमाणीकरण करणे अनिवार्य आहे. नैसर्गिक आपत्ती, अनियमित पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट आदी कारणांमुळे पीक कर्जाची परतफेड वेळेत न करू शकलेल्या शेतकऱ्यांसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदत…

Read More

ओंकारनगर'चा दिंडी सोहळा:लेझीमचा ठेका अन् पर्यावरणाचा मेळा, केडगाव परिसरात रिंगण सोहळा, फुगडीचा उत्सा

मनपाच्या केडगाव येथील प्रथम आयएसओ मानांकन प्राप्त ओंकारनगर प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीचे औचित्य साधून केडगाव परिसरात ‘बालदिंडी’ काढली. भक्तीरसात न्हाऊन निघालेल्या या बालदिंडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षण आणि सामाजिक प्रबोधनाचा संदेश देऊन उपस्थितांची मने जिंकली. ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’च्या जयघोषात निघालेल्या या बालदिंडीचे ठिकठिकाणी नागरिक आणि भाविकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. विठ्ठलाच्या भक्तीगीतांवर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या…

Read More

स्वदेशी काउंटर-ड्रोन प्रणाली 'भार्गवास्त्र'ची चाचणी:सैन्याच्या कम्युनिकेशन नेटवर्कशी जोडले जाऊ शकते; ड्रोनच्या झुंडीला रोखू शकते

सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड (SDAL) ने नागपूरमध्ये भारतीय लष्करासमोर त्यांच्या स्वदेशी काउंटर-ड्रोन प्रणाली ‘भार्गवास्त्र’ ची यशस्वी थेट चाचणी केली. कंपनीचा दावा आहे की, ही प्रणाली हवाई हल्ले आणि ड्रोन स्वार्म (ड्रोनचे थवे) यांसारख्या वाढत्या धोक्यांना तोंड देण्यासाठी सज्ज आहे. याला लष्कराच्या कमांड आणि कम्युनिकेशन नेटवर्क C4I शी देखील जोडले जाऊ शकते. सध्याच्या माहितीनुसार, ही…

Read More

बंद:विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ राहुरी कडकडीत बंद

दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस लाठीचार्जच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदच्या हाकेला राहुरी तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वंचितचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव व जिल्हा संपर्कप्रमुख पिंटू साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी शहरात व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने शंभर टक्के बंद पाळत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. वंचित बहुजन आघाडी तसेच विविध सामाजिक संघटनांच्यावतीने सकाळी रॅलीची सुरुवात करण्यात आली. कार्यकर्त्यांनी मोटारसायकल रॅलीद्वारे राहुरी शहरातून…

Read More

सायबर भामट्यांचा गेम ओव्हर:फसवणूक रोखण्यासाठी आता ‘डिजिटल नाकेबंदी’, हायटेक यंत्रणेद्वारे रिअल टाईम ट्रॅकिंग

सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि ऑॅनलाईन आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी राज्यात आता डिजिटल नाकेबंदी सुरू करण्यात आली आहे. गृह विभागाच्या आदेशाने सर्व सायबर पोलिस ठाण्यात ही कार्यवाही सुरू झाली आहे. या अत्याधुनिक मोहिमेंंतर्गत संशयित व्यवहार, बनावट काॅल आणि अार्थिक फसवणुकीचे केंद्र ठरणाऱ्या खात्यांना रिअल टाईम रोखले जाईल. खाते फ्रिज, सिम ब्लाॅक, अन् रिअल टाईम ट्रॅकिंग हे…

Read More

इगतपुरीत ७२ तासांत ६१५ मिमी:३० दिवसांचा पाऊस तीनच दिवसांत; भावली, भाम धरणे ओव्हरफ्लो

इगतपुरी तालुक्यात ७२ तासांत तब्बल ६१५ मिमी पावसाची विक्रमी नोंद झाली असून, अवघ्या तीन दिवसांत महिनाभराचा पाऊस झाला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून, पूर, दरडी कोसळणे आणि रस्ते खचण्याच्या घटना अनेक ठिकाणी घडल्या आहेत. पावसामुळे भावली, भाम आणि दारणा धरणे ओव्हरफ्लो झाली असून, दारणा धरणातून विक्रमी १९ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग…

Read More