परभणीत बोकड देतोय अर्धा लिटर दूध:परिसरातील शेतकरी, पशुपालकांत कुतूहल, बोकडाला पाहण्यासाठी होतेय गर्दी
गंगाखेड तालुक्यातील गौंडगाव येथे निसर्गाचा चमत्कार पाहायला मिळत आहे. येथील गोविंद कुकडे यांच्या मालकीचा बोकड दूध देत असल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ही दुर्मिळ घटना पाहण्यासाठी परिसरातील नागरिक, शेतकरी व पशुपालक मोठ्या संख्येने गौंडगाव येथे भेट देत आहेत. दीड वर्षे वयाचा हा बोकड दररोज अर्धा लिटर दूध देतो. गौंडगाव येथील कुकडे यांचा दूध…