Headlines

छत्रपती शिवरायांनी अफझलखानाचा कोथळा काढला तेव्हा डीजे वाजला नव्हता:हिंदू सुरक्षित आहेत, कोणी स्वतःला 'हिंदूहृदयसम्राट' समजू नये- संजय राऊत

भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांनी गेल्या 10 वर्षांत देशातील सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्याचे काम केले आहे. आज देशात हिंदू पूर्णपणे सुरक्षित आहेत, त्यांना कोणताही धोका नाही. तरीही सर्व विषय त्याच मुद्द्यावर नेऊन मूळ प्रश्नांना बगल दिली जाते. इतिहास साक्षी आहे की, हिंदू ज्या ज्या वेळी संकटात सापडला, त्या वेळी फक्त बाळासाहेब…

Read Full News

पिंपरीमध्ये महर्षी दयानंद सरस्वतींच्या प्रवचनांचा 151 वा स्मृती समारंभ:वेदपालजी आर्य म्हणाले- त्यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला

पुण्यात महर्षी दयानंद सरस्वतींच्या पुणे प्रवास प्रवचनांचा 151 वा स्मृती समारंभ पिंपरी येथील आर्य समाज भवन येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात वेदपालजी आर्य यांनी सांगितले की, महर्षी दयानंद सरस्वतींनी 1875 साली पुण्यात 35 व्याख्याने दिली होती. या व्याख्यानांमधून त्यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला. हा स्मृती समारंभ महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभा, पिंपरी, पुणे, नाना पेठ,…

Read Full News

विद्यार्थी म्हणाले- 10 मिनिटांपूर्वी निघालो, अन्यथा दबलो असतो:इमारत तडकण्याचे आवाज येत होते; सुट्टीमुळे वाचले अनेक जण

नशीब आम्ही वाचलो… हे दिल्लीतील सत्य निकेतन येथील वसतिगृहातून काही वेळापूर्वी बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या मते, इमारत कोसळण्यापूर्वी काही वेळ आधी भिंतीला तडे जाण्याचे (क्रॅक) आवाजही येत होते. काही विद्यार्थ्यांनी सांगितले की, ते दुर्घटनेच्या अवघ्या 10-20 मिनिटांपूर्वीच इमारतीतून बाहेर पडले होते. परतल्यावर सर्व काही उद्ध्वस्त झाले होते. इमारतीच्या तळघरात गत एक आठवड्यापासून काम…

Read Full News

महाराष्ट्रात पावसाची प्रतीक्षा कायम:कोकणात जोर, विदर्भात 11 सप्टेंबरला मुसळधार पावसाचा अंदाज; पश्चिम महाराष्ट्रात तापमान वाढणार

ऑगस्ट महिन्यात अपेक्षेच्या तुलनेत कमी पाऊस झाल्यानंतर आता सप्टेंबरमध्ये तरी राज्यात दमदार पाऊस पडणार का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत पावसाने विश्रांती घेतली असून, तापमानातही वाढ जाणवत आहे. मात्र, भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार राज्यात पावसाची शक्यता पूर्णपणे संपलेली नाही. कोकण आणि गोवा परिसरात पुढील काही दिवस अनेक ठिकाणी…

Read Full News

संजय दत्तला हसून दाद, अन् रिक्षाचालकांना दमदाटी?:भाजप आमदार नरेंद्र मेहतांचा मंत्री प्रताप सरनाईकांवर घणाघात, मराठीच्या मुद्द्यावरून डिवचलं

ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवात बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने मराठी भाषेबाबत केलेल्या एका विधानावरून आता राज्याच्या राजकारणात मोठा वाद पेटला आहे. राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना (शिंदे गट) नेते प्रताप सरनाईक यांच्यावर भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी सडकून टीका केली आहे. “संजय दत्तला मराठी येत नसल्याचे सांगताना तुम्ही हसता आणि दुसरीकडे सर्वसामान्य रिक्षाचालकांना…

Read Full News

धनंजय मुंडेंचा वर्कआऊट करतानाचा व्हिडिओ चर्चेत:‘काटे खोलवर रुतले आहेत, तरी पाऊल पुढे टाकतो आहे…’, राजकीय पुनरागमनाचे संकेत!

मागील काही महिन्यांपासून राज्याच्या सक्रिय राजकारणापासून काहीसे दूर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मुंडे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम खात्यावर जिममध्ये व्यायाम करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला असून, त्यासोबत लिहिलेल्या कवितेच्या ओळींमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, या व्हिडिओत मुंडे यांचा बदललेला आणि अधिक तंदुरुस्त दिसणारा लूकही लक्ष…

Read Full News

मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 10 वा दिवस:पाणी अन् उपचार नाकारल्याने प्रकृती खालावली, वैद्यकीय तपासणीलाही दिला नकार

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या आंदोलनाचा 10 वा दिवस आहे. गेली 2 दिवस त्यांनी उपचार आणि पाणी न घेण्याचा निर्णय घेतल्याने त्यांची प्रकृती खराब झाली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी‎ मनोज जरांगे पाटील यांचे ‎आमरण उपोषण सुरू आहे. प्रकृती ‎खालावत असतानाही जरांगे‎ पाटील यांनी पाणी, सलाइन ‎तसेच वैद्यकीय उपचार घेण्यास‎…

Read Full News

सेन्सेक्स 100 अंकांनी घसरून 76,400 वर:निफ्टीही 50 अंकांनी घसरला, 23,850 च्या पातळीवर करत आहे व्यवहार

शेअर बाजारात आज सोमवार, 7 सप्टेंबर रोजी घसरण आहे. सेन्सेक्स 100 अंकांनी घसरून 76,400 वर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्ये 50 अंकांची घसरण आहे, तो 23,850 च्या पातळीवर आला आहे. आशियाई बाजारात संमिश्र व्यवहार 3 सप्टेंबर रोजी अमेरिकन बाजारात घसरण झाली होती स्थानिक गुंतवणूकदारांनी ७ दिवसांत १८,५६८ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले शुक्रवारी बाजारात तेजी होती…

Read Full News

मंगरुळ चव्हाळा येथे ‘भीक मांगो’ आंदोलन:ग्रामपंचायत प्रशासनाच्या निष्काळजी धोरणाविरुद्ध पुकारला एल्गार‎

तालुक्यातील मंगरूळ चवाळा गावातील युवकांनी एकत्र येऊन ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट नितीविरुद्ध भिक मागो आंदोलन केले. कित्येक वर्षांपासून ग्रामसभा होत नसून सर्व निर्णय चार भिंतींच्या आत घेतले जात असल्याचा आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे. त्यामुळे गावातील तातडीची विकासकामे करण्यासाठी आता गावकऱ्यांकडे भिक मागण्याशिवाय दुसरा उपाय राहिला नाही. म्हणून आम्ही हे आंदोलन हाती घेतले, असे त्यांचे म्हणणे आहे. गावकऱ्यांनी यापूर्वी…

Read Full News

गुन्हेगारीमुक्त शहरासाठी राजकीय भेद बाजूला; संघटनाही एकवटल्या:आरोपीला कायद्यानुसार शिक्षा होण्याचे प्रमाण वाढवण्याची गरज‎

शहरातील वाढती गुन्हेगारी, बालगुन्हेगारी, महिलांची सुरक्षा आणि पोलिसिंग अधिक प्रभावी व्हावी, या उद्देशाने रविवारी (दि. ६) शासकीय विश्रामगृह येथे विविध सामाजिक, राजकीय व समविचारी संघटनांच्या प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक झाली. अमरावती शहराला गुन्हेगार . शहरातील वाढत्या गुन्हेगारीबाबत प्रतिनिधींनी तीव्र चिंता व्यक्त केली. ‘हत्यारमुक्त अमरावती’ अभियानासाठी विशेष समिती स्थापन करण्याची मागणी करण्यात आली. महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी पथकाची…

Read Full News