दुष्काळामुळे मराठवाड्यात 35 हजार कोटींचे नुकसान:हेक्टरी 1 लाखाची मदत द्या- रोहित पवार, कठीण प्रसंगी 5 हजारांची मदत देऊन शेतकऱ्यांची थट्टा केल्याची टीका
मराठवाड्यात ५५ टक्के कमी पाऊस झाला असून यामुळे शेतकऱ्यांचे सुमारे ३५ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांची चेष्टा न करता हेक्टरी १ लाख रुपयांची ठोस आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. पदवीधर निवडणुकीसाठी मतदारांशी संवाद साधण्यासाठी पवार शहरात आले असताना त्यांनी…