अहंकार बाळगला की 'गोकुळ'सारखा निकाल लागतो:उदय सामंतांचा भाजप नेते जयकुमार गोरेंना टोला, 27 तारखेला सचिन सानप कोण हे कळेल!
“लोकशाहीमध्ये सर्वसामान्य उमेदवारालाही कमी लेखणे किंवा हिणवणे योग्य नसते. ज्या उमेदवाराला ४ मतेही मिळणार नसतील, तरी तो लोकशाहीतील उमेदवार असून त्याचा सन्मान राखला पाहिजे. ‘आमच्याकडे सत्ता आहे, मी बोलेन तेच अंतिम आणि खरं’, अशी अहंकाराची भावना जेव्हा डोक्यात शिरते, तेव्हा ‘गोकुळ’ दूध संघासारखा दणका बसतो. सत्ताधाऱ्यांनी हा अतिरेक वेळीच थांबवला नाही, तर मतदार असाच धडा…