Headlines

अकोटमध्ये 73 नवदुर्गा, 19 शारदा मंडळांची स्थापना:रंगरंगोटी अन् आकर्षक सजावट, विद्युत रोषणाईने मंदिर परिसर उजळून निघाला‎

अकोट शहरात रविवारी नवरात्र महोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. यानिमित्त शहरात ७३ नवदुर्गा मंडळे, तर १९ शारदा मंडळांची स्थापना करण्यात आली आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या महोत्सवादरम्यान शहरातील विविध देवी मंदिरांसह सार्वजनिक नवरात्र मंडळांच्यावतीने घटस्थापना करण्यात आली. दररोज भजन, कीर्तन, यज्ञासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतकरी चिंतेत…

Read Full News

आमिर खानच्या भाचीसोबत पोलिसांनी केली क्रूरता:व्हिडिओमध्ये दाखवले दुखापतीचे अनेक व्रण, प्रोटेस्टमधून इम्रान खानसोबत ताब्यात घेतले होते

आमिर खानची भाची जायन मेरी ८ ऑक्टोबर रोजी मुंबईत कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात सहभागी झाली होती. तिच्यासोबत चुलत भाऊ आणि अभिनेता इम्रान खानही पोहोचला होता. आंदोलनात सहभागी झाल्यामुळे तिला ताब्यात घेण्यात आले होते. आता जायनने एक व्हिडिओ जारी करून ताब्यात असताना झालेल्या मारहाणीमुळे शरीरावर झालेल्या जखमांच्या खुणा दाखवल्या आहेत. जायन मेरीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून…

Read Full News

सेन्सेक्समध्ये 300 अंकांची वाढ; 72,800 वर व्यवहार:निफ्टीतही 100 अंकांची वाढ; ऑटो आणि IT शेअर्समध्ये अधिक खरेदी

शेअर बाजारात आज म्हणजेच 12 ऑक्टोबरला तेजी आहे. सेन्सेक्स 300 अंकांहून अधिक वाढीसह 72,800 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही 100 अंकांहून अधिक तेजी आहे, तो 22,650 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. ऑटो, IT आणि मीडिया शेअर्समध्ये आज अधिक खरेदी दिसत आहे. आशियाई बाजारांमध्ये संमिश्र व्यवहार अमेरिकी बाजारात 9 ऑक्टोबरला तेजी राहिली परदेशी गुंतवणूकदारांनी (FIIs)…

Read Full News

ओटीतील साड्यांनी मेळघाटातील महिलांची दिवाळी:गेल्या दोन दशकांपासून राबवली जाते परंपरा, एकवीरा देवीच्या ओटीतल्या साड्या देतात आदिवासी महिलांना भेट‎

आई श्री एकवीरा देवी संस्थानाद्वारे दर दिवाळीला मेळघाटातील आदिवासी महिला व युवतींसाठी साडी-चोळीची भेट पाठवली जाते. आदिवासींची दिवाळीही चांगली व्हावी म्हणून देवीला ओटीत आलेल्या साड्या या आदिवासी महिला व युवतींना भेट दिल्या जातात. पारधी बेड्यांच्या उत्थानासाठी संस्थानाकडून सातत्याने काम सुरू आहे. खुद्द संस्थानातील पदाधिकारी व एका बाह्य संस्थेच्या मदतीने पारधींना सातत्याने धान्याचे वाटप केले जाते….

Read Full News

राजस्थानमध्ये माजी आमदार अतार सिंह भडाना यांची मारहाण करून हत्या:ग्रामस्थांनी काठ्या-दगडांनी केला हल्ला, क्रेशरवरून सुरू होता वाद

राजस्थानातील भरतपूर जिल्ह्यातील बयाना येथील माजी आमदार आणि भाजप नेते अतर सिंह भडाना यांची हत्या करण्यात आली. अतर सिंह रविवारी संध्याकाळी ६:३० वाजता भौंड़ा गावातील त्यांच्या क्रशर खाण लीजवर (प्लांटवर) पोहोचले होते. याचदरम्यान ७० ते ८० जणांनी त्यांच्यावर लाठ्या-काठ्या आणि दगडांनी हल्ला केल्याचा आरोप आहे. हल्ल्यात अतर सिंह आणि त्यांचे सहकारी गगन शर्मा गंभीर जखमी…

Read Full News

ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक:आज राज्यभर स्वाक्षरी मोहीम, राज ठाकरे शिवाजी पार्कवर लावणार हजेरी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आता आक्रमक झाली आहे. ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात मनसेकडून आज राज्यभरात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येणार असून, पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः या मोहिमेत सहभागी होणार आहेत. शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची उपस्थिती या मोहिमेबाबत माहिती देताना मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले…

Read Full News

लोकसेवा हक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करावी:राज्य सेवा हक्क आयुक्त अरुण डोंगरे यांचे निर्देश‎

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ ची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र नागरिकांना अधिसूचित सेवा विहित कालावधीत तसेच पारदर्शक, सुलभ व रियल टाईम पद्धतीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश अमरावती विभागाचे राज्य सेवा हक्क आयुक्त अरुण डोंगरे यांनी दिले आहेत. येथील संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात आयोजित बैठकीत अधिनियमाच्या अंमलबजावणी व कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. यावेळी राज्य सेवा…

Read Full News

विजय वडेट्टीवारांचा ‘चलो दिल्ली’चा नारा:राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी

देशात मतचोरी झाल्याचा गंभीर आरोप करत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात त्यांनी ‘चलो दिल्ली’चा नारा दिला असून, याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. मतचोरीचा आरोप आणि राजीनाम्याची मागणी विजय वडेट्टीवार…

Read Full News

40 दिवसांत 8.77 टीएमसी उपसा:आजपासून उजनीचे पाणी शेतीस बंद, ऊस, केळी उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात‎

यावर्षी सोलापूर जिल्ह्यात केवळ ५० टक्केच पाऊस झाल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात गंभीर दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी खरीप पिके आधीच पूर्णपणे करपली असून, आता रब्बी हंगामही वाया जाण्याच्या मार्गावर आहे. या भीषण संकटाच्या पार्श्वभूमीवर, उजनी धरणातील पाणी आता केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. पाणीसाठा ८३ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे उद्यापासून…

Read Full News

‘आई राजा उदो उदो’च्या जयघोषाने श्रीदेवीचा माळ दुमदुमला!:श्री कमलाभवानी मंदिरात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाला प्रारंभ

करमाळा तालुक्यातील श्रीदेवीचा माळ येथील प्रसिद्ध श्री कमलाभवानी मंदिरात रविवारी (ता. ११) सकाळी नऊ वाजता विधिवत घटस्थापना करून नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला. ‘आई राजा उदो उदो, सदानंदीचा उदो उदो’ या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला. नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी देवीच्या दर्शनासाठी तसेच ज्योत नेण्यासाठी विविध गावांतील भाविक आणि तरुण मंडळांनी मंदिरात गर्दी केली होती. मंदिराचे विश्वस्त शिरीषकुमार…

Read Full News