केळीचे दर घसरले; सुरू केळी 17 रुपये किलो:तर खोडव्याला 5 रुपयेही मिळेना, दुष्काळी परिस्थितीत केळीच्या बागा जगवण्यासाठी धडपड सुरू असतानाच बाजारभावही घसरल्याने दुहेरी संकट
. दुष्काळाच्या तीव्र झळा सहन करत आणि लाखो रुपयांची गुंतवणूक करून जगवलेल्या बेंबळे परिसरातील केळी बागांवर सध्या संकटाचे सावट आले आहे. काढणीला आलेल्या पिकाला बाजारात कवडीमोल भाव मिळत असल्याने उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. व्यापारी अत्यंत कमी दराने खरेदी करत असल्याने उत्पादन खर्च वसूल करणेही कठीण झाले आहे. गतवर्षी निर्यातक्षम केळीला प्रतिकिलो २८ ते ३०…