Headlines

NCERT च्या नववीच्या पुस्तकातून रशियन आणि फ्रेंच क्रांती गायब:7व्या शतकातील भारत, राणी अबक्का यांचा समावेश; जाणून घ्या नव्या पुस्तकातून काय हटवले, काय जोडले

NCERT ने इयत्ता 9 वीच्या सामाजिक शास्त्राच्या ‘अंडरस्टँडिंग सोसायटी: इंडिया अँड बियॉन्ड-पार्ट 2’ या नवीन पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी केले. नवीन पुस्तकातून पूर्वीचे अनेक अध्याय काढून टाकण्यात आले असून भारतीय शासकांचे संघर्ष आणि राण्यांच्या शौर्यगाथांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच, धार्मिक कारणांमुळे भारताला सातव्या शतकापासून आक्रमणांचा सामना करावा लागला असल्याचा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे….

Read Full News

दिवेआगर समुद्र दुर्घटनेवर गिरीश महाजन संतापले:‘मुलांना एवढ्या खोल पाण्यात का जाऊ दिलं?’ सखोल चौकशीचे आदेश

रायगड जिल्ह्यातील दिवेआगर येथे सहलीसाठी गेलेल्या आळंदीतील विद्यार्थ्यांवर काळाने घाला घातला. समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांपैकी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे आळंदीसह संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे. मृत विद्यार्थी आळंदीतील विनर्स अकॅडमीशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेनंतर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया देत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी संबंधित अकॅडमी…

Read Full News

दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा:पीक कर्जाचे पुनर्गठन, वसुलीलाही स्थगिती

राज्यातील दुष्काळी परिस्थिती घोषित करण्यात आलेल्या 265 तालुक्यांतील शेतकऱ्यांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. खरीप 2026 हंगामात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचे मध्यम मुदतीच्या कर्जात पुनर्गठन करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. तसेच शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीलाही स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली. दुष्काळामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जफेडीसाठी अतिरिक्त…

Read Full News

अमरावती जिल्ह्याची नजरअंदाज पैसेवारी 47 टक्के:दुष्काळाचे संकेत; सर्व 14 तालुके आधीच दुष्काळग्रस्त घोषित

अमरावती जिल्ह्याची नजरअंदाज पैसेवारी सरासरी ४७ टक्के घोषित करण्यात आली आहे. ५० टक्क्यांपेक्षा कमी पैसेवारी दुष्काळाचे संकेत देते. यामुळे जिल्ह्यात दुष्काळाचे सावट असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावर्षी पावसातील मोठ्या खंडामुळे शासनाने अमरावती जिल्ह्यातील सर्व १४ तालुके आधीच दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केले आहेत. यावर नजरअंदाज पैसेवारीने शिक्कामोर्तब केले आहे. जिल्ह्यात यावर्षी केवळ ५६ टक्के पाऊस झाला…

Read Full News

डॉक्टरांवरील हल्ल्यांमुळे सुप्रीम कोर्ट नाराज:म्हटले- कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही, निवडून आलेल्या नेत्यांची जबाबदारी अधिक; शिवसेनेच्या नगरसेवकाचा जामीन रद्द

सर्वोच्च न्यायालयाने डॉक्टर आणि सरकारी कर्मचाऱ्यांवर वाढत्या हल्ल्यांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयाने म्हटले की, कायद्याचा आदर करण्याची सर्वाधिक जबाबदारी जनतेने निवडून दिलेल्या नेत्याची असते. त्यांच्या पदाची ताकद कधीही कायद्यापेक्षा मोठी असू शकत नाही. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठाने शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे आणि अन्य तिघांचा जामीन रद्द करताना ही टिप्पणी…

Read Full News

विधान परिषद निवडणुकीसाठी 2 उमेदवारांनी 3 अर्ज दाखल केले:माजी आमदार देशपांडे यांनी शिवसेना आणि अपक्ष असे दोन अर्ज भरले; उद्या सुटी

अमरावती प्रतिनिधी: विधान परिषदेच्या अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघासाठी गुरुवारी, १ सप्टेंबर रोजी दोन उमेदवारांनी तीन अर्ज दाखल केले. माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांनी शिवसेना (शिंदे गट) आणि अपक्ष असे दोन अर्ज भरले. किरण अर्जुन चौधरी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. शिवसेनेने अद्याप अधिकृत उमेदवाराचे नाव जाहीर केलेले नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच नावाची…

Read Full News

अप्पर वर्धा धरणातील जलसाठा 40 टक्क्यांनी घटला:उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईचे संकट, शेती व उद्योगाच्या आरक्षणावर टांगती तलवार

अमरावती जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या मोर्शी तालुक्यातील अप्पर वर्धा धरणातील पाणीसाठा यावर्षी ४०.५२ टक्क्यांनी घटला आहे. यामुळे आगामी उन्हाळ्यात अमरावतीसह ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. पाणीसाठा कमी झाल्याने शेती आणि उद्योगांसाठी दिल्या जाणाऱ्या पाण्याच्या आरक्षणावर फेरविचार करावा लागणार आहे. जलसंपदा विभागाने महसूल विभागासोबत पत्रव्यवहार सुरू केला आहे. अप्पर वर्धा धरण अमरावती, बडनेरा, मोर्शी…

Read Full News

UPI व्यवहार ग्राहकांसाठी विनामूल्यच राहणार:नव्या MDR शुल्काचा दैनंदिन व्यवहारांवर परिणाम नाही – बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक निधू सक्सेना यांची स्पष्टोक्ती

देशभरात डिजिटल पेमेंटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत असताना UPI व्यवहारांवर शुल्क आकारले जाणार का, याबाबत ग्राहक आणि व्यापाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे. मात्र, सामान्य ग्राहकांच्या दैनंदिन UPI व्यवहारांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, असे बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निधू सक्सेना यांनी स्पष्ट केले आहे. UPI व्यवहार ग्राहकांसाठी विनामूल्यच राहणार असून, प्रस्तावित…

Read Full News

कोरकू भाषिक आशा सेविकांच्या नियुक्तीसाठी मेळघाटातील आदिवासींचा ठिय्या:सीईओंनी जमिनीवर बसून मागणी मान्य केली; गाडसिंबावासियांनी पुढाकार घेतला

मेळघाटातील शेकडो आदिवासी महिला व तरुणांनी कोरकू आशा सेविका नियुक्तीसाठी अमरावती जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन केले. भाषेच्या अडचणीमुळे स्थानिक महिलांना प्राधान्य देण्याची मागणी होती. दयाराम बेलसरे आणि अनिकेत मावस्कर यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. डॉ. प्रवीण पारिसे यांच्या कार्यालयासमोर आंदोलन झाले. समाधान न झाल्याने आंदोलकांनी सीईओ सत्यम गांधी यांच्या कक्षासमोर ठिय्या दिला. तीन तास चाललेल्या आंदोलनानंतर…

Read Full News

आयटकचे श्याम काळे यांचे कामगारांना संघर्ष तीव्र करण्याचे आवाहन:केंद्र व राज्य सरकारच्या कामगारविरोधी धोरणांविरोधात एकजुटीने लढण्याचे आवाहन.

अमरावती येथे झालेल्या आयटकच्या जिल्हा अधिवेशनात राज्य सरचिटणीस कॉम्रेड श्याम काळे यांनी कामगारांना संघर्ष तीव्र करण्याचे आवाहन केले. चार श्रमसंहिता आणि केंद्र व राज्य सरकारच्या कामगारविरोधी धोरणांविरोधात एकजूट मजबूत करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. हे अधिवेशन रेल्वे स्टेशनसमोरील उर्जाभवन येथे कॉम्रेड जे. एम. कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. भाकपचे जिल्हा सचिव कॉ. सुनील मेटकर व…

Read Full News