बाबाजी दाते महिला बँकेत 242 कोटींचा अपहार:‘ईडी’चे यवतमाळ, वणीत धाडसत्र, सकाळी 6 पासून सुरू झालेली झाडाझडती सायंकाळपर्यंत होती सुरू
संपूर्ण राज्यात गाजलेल्या यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेच्या २४२ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणात ईडीच्या पथकाने गुरुवारी यवतमाळ आणि वणी शहरात ९ ठिकाणी छापेमारी केली. बँकेचे थकीत कर्जदार, मूल्यांकन अधिकारी, संचालक आणि तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कंचलवार यांच्या घरी हे छापे टाकण्यात आले. दोन इनोव्हा वाहनांतून आलेल्या या पथकात महिला अधिकारी व सशस्त्र सुरक्षा…