Headlines

भातकुलीत जलजीवन मिशनचे जलकुंभ शोभेचे बाहुले:दोन वर्षांपासून पाईपलाईन नाही, अनेक गावांना 4 ते 6 दिवसांनी पाणी

अमरावती जिल्ह्यातील भातकुली आणि खारपाण पट्ट्यात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या आहे. जलजीवन मिशन योजनेचे नियोजन कोलमडले असून, नागरिकांना ४ ते ६ दिवसांनी अपुरे आणि खारट पाणी मिळते. दोन वर्षांपूर्वी बांधलेले जलकुंभ पाईपलाईनअभावी कोरडेच आहेत. अमरावती जिल्हा बँकेचे संचालक हरिभाऊ मोहोड यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली. भातकुली तालुक्यातील आसरा, टाकळीखेडा शंभा, वाठोडा…

Read Full News

अमरावतीत कॉलेज विद्यार्थिनीवर चाकू हल्ला:आरोपीवर गंभीर गुन्हे दाखल करून कठोर कारवाईची तैलिक समितीची मागणी

अमरावतीमध्ये एका फार्मसी विद्यार्थिनीवर तिच्याच वर्गातील विद्यार्थ्याने चाकूने हल्ला केला. या जीवघेण्या हल्ल्यातून ती थोडक्यात बचावली. या घटनेच्या निषेधार्थ अमरावती जिल्हा तैलिक समिती आणि महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने केली. आरोपीवर गंभीर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेऊन त्यांनाही निवेदन दिले. या…

Read Full News

मनोज जरांगेंच्या समर्थकांवर अखेर गुन्हा दाखल:महिला आंदोलकाच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई, 10 ते 11 जण अडचणीत

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. जरांगे यांच्या आंदोलनात सक्रिय असलेल्या महिला आंदोलक ललिता तारख यांना सोशल मीडियावर ट्रोल करणे, धमक्या देणे तसेच त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह आणि अश्लील स्वरूपाचे आरोप करून ते व्हायरल केल्याप्रकरणी 10 ते 11 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ललिता तारख यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबड…

Read Full News

Maharashtra Shivbhojan Scheme New Rules; CCTV Mandatory & Penalty Imposed

राज्यातील गरीब, मजूर आणि गरजू नागरिकांना सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या शिवभोजन योजनेच्या अंमलबजावणीत आता अधिक काटेकोरपणा आणला जाणार आहे. योजनेतील गैरप्रकार, बनावट लाभार्थी आणि अनियमितता रोखण्यासाठी राज्य सरकारने शिवभो . शिवभोजन योजना 26 जानेवारी 2020 पासून राज्यात सुरू आहे. या योजनेत दोन चपाती, भाजी, वरण आणि भात असलेली थाळी लाभार्थ्यांना सवलतीच्या…

Read Full News

HDFC Bank Appoints Anup Bagchi as New MD & CEO

मुंबई9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक HDFC बँकेने अनूप बागची यांची आपले नवे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. बागची 27 ऑक्टोबरपासून पदभार स्वीकारतील. त्यांचा कार्यकाळ 3 वर्षांचा असेल. RBI कडून मंजुरी मिळाल्यानंतर बँकेने 1 ऑक्टोबर रोजी स्टॉक एक्स्चेंजला केलेल्या फाइलिंगमध्ये याबाबत माहिती दिली. विद्यमान MD आणि CEO शशिधर जगदीशन यांचा कार्यकाळ 26…

Read Full News

बाल्यावस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी ‘पहिल्या हजार दिवसांचे मिशन:स्वतंत्र सचिवालयाची स्थापना होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

बाल्यावस्थेतील सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारकडून ‘हजार दिवसांचे बाल्यावस्था विकास मिशन’ राबविण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. माता आणि बालकांना केंद्रस्थानी ठेवून आरोग्य, पोषण, शिक्षण आणि इतर संबंधित बाबींवर एकात्मिक पद्धतीने काम करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या मिशनचा सविस्तर आराखडा मंत्रिमंडळापुढे सादर करण्यास सांगण्यात आले असून, मिशनसाठी स्वतंत्र सचिवालय स्थापन करून आकडेवारीच्या…

Read Full News

महावितरणच्या नाट्यस्पर्धेतून वीज कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव:‘वारी’ आणि ‘मिना’ने पहिल्याच दिवशी रंगत वाढवली

दिवसभर वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी धावपळ करणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना आपल्या कलागुणांना सादर करण्यासाठी नाट्यस्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठ मिळाले आहे. छत्रपती संभाजीनगर येथील तापडिया नाट्यमंदिरात महावितरणच्या प्रादेशिक आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेला गुरुवारी (१ ऑक्टोबर) सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी जळगाव आणि नांदेड परिमंडलाच्या कलाकारांनी सादर केलेल्या ‘वारी’ आणि ‘मिना’ या नाटकांना प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक…

Read Full News

राजधानी एक्स्प्रेसमध्ये 1.05 कोटींचे ड्रग्ज जप्त:गोंदियात बिबट्याचे कातडेही पकडले; डीआरआयच्या 3 दिवसांतील 2 कारवायात महिला तस्करासह दोघे ताब्यात

डीआरआयच्या नागपूर युनिटने तीन दिवसांत दोन कारवाया केल्या. यात आंतरराज्यीय अंमली पदार्थ आणि वन्यजीव तस्करी उघडकीस आणली. २७ सप्टेंबर रोजी राजधानी एक्स्प्रेसमधून १.३१२ किलो ॲम्फेटॅमिन जप्त केले. याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत ₹१.०५ कोटी आहे. एका भारतीय महिला प्रवाशाच्या सुटकेसमधील गुप्त कप्प्यात हे ड्रग्ज सापडले. तिला एनडीपीएस कायद्यानुसार अटक करून न्यायालयात हजर केले. २९ सप्टेंबर रोजी…

Read Full News

अभिजित दीपकेंकडून शिवाजी महाराजांचा अपमान?:‘कॉकरोच’च्या फोटोवरून नितेश राणेंचा संताप, माफी मागण्याची मागणी

कॉकरोच जनता पार्टीकडून 2 ऑक्टोबर रोजी मुंबईतील शिवाजी पार्क येथे प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांच्यावर गंभीर आरोप करत छत्रपती शिवाजी महाराजांचा कथित अवमान केल्याचा दावा केला आहे. दीपके यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका फोटोवरून राणे यांनी आक्षेप घेतला असून, या…

Read Full News

दिवेआगर समुद्रकिनारी मोठी दुर्घटना:सहलीसाठी आलेल्या 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध दिवेआगर समुद्रकिनारी गुरुवारी मोठी आणि दुर्दैवी दुर्घटना घडली. पुणे जिल्ह्यातील आळंदी परिसरातून सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांपैकी समुद्रात पोहण्यासाठी उतरलेले ८ विद्यार्थी पाण्यात बुडाले. या घटनेत आठही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. समुद्राच्या पाण्याची खोली आणि लाटांचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. आळंदीहून सहलीसाठी दिवेआगरला आले होते…

Read Full News