दुष्काळी परिस्थितीमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई:वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी तांत्रिक यंत्रणा ‘हायअलर्ट’वर
राज्यात दुष्काळाची छाया पसरल्याच्या पार्श्वभूमीवर महावितरणने आपल्या संपूर्ण तांत्रिक यंत्रणेला ‘हायअलर्ट’वर ठेवले आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतीसह सर्व वर्गवारीतील ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा मिळावा, यासाठी राज्यभरातील अभियंते, यंत्रचालक आणि तारमार्ग कर्मचाऱ्यांना आपापले मुख्यालय न सोडण्याचे सक्त आदेश देण्यात आले आहेत. महावितरणचे संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांनी याबाबत नुकतेच परिपत्रक जारी केले आहे. यंदाच्या जून महिन्यापासून राज्यात पर्जन्यमानात…