Headlines

ना दारू पाजली, ना मटण चारलं; 25,000 पदवीधरांनी ताकद दाखवली!:तिकीट दिलं असतं तर डीजे लावून घरी आलो असतो; कराळे मास्तरांचा काँग्रेसला सणसणीत टोला

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या अटीतटीच्या निवडणुकीत कोणत्याही मोठ्या राजकीय पक्षाचा पाठिंबा नसताना अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरलेल्या नितेश कराळे उर्फ ‘कराळे मास्तर’ यांनी तब्बल 25,000 वैध मते खेचून महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही प्रस्थापित आघाड्यांच्या नाकात चांगलाच दम आणला आहे. “कोणतेही होर्डिंग-बॅनर न लावता, मतदारांना न दारू पाजता, न मटण चारता आणि कोणालाही एक…

Read Full News

मी 18 वर्षांचा दुष्काळ संपवला अन् प्रस्थापित गिळला!:मराठवाडा पदवीधरमध्ये 20 हजारांवर मते घेणाऱ्या रिलस्टार रविराज साबळेंची प्रतिक्रिया

मराठवाडा विभाग पदवीधर मतदारसंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत प्रस्थापित राजकीय पक्षांची मक्तेदारी मोडून काढत एका शेतकरीपुत्राने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. सोशल मीडियावरील प्रसिद्ध रिलस्टार आणि उद्यमशील शेतकरी रविराज साबळे-पाटील यांनी अपक्ष म्हणून मैदानात उतरत तब्बल 20,450 पहिल्या पसंतीची मते मिळवत महायुतीचे सलग 3 टर्म आमदार राहिलेले प्रस्थापित नेते सतीश चव्हाण यांच्या पराभवाचा मार्ग सुकर केला….

Read Full News

मतदारांना गृहीत धरणाऱ्या प्रस्थापितांना चपराक!:मराठवाडा पदवीधरमध्ये महाविकास आघाडीचे डॉ. प्रतापसिंह पाटील विजयाच्या उंबरठ्यावर

“प्रस्थापित सत्ताधारी किंवा नेत्यांनी मतदारांना गृहीत धरले की जनता काय चमत्कार घडवू शकते, हे या निकालाने दाखवून दिले आहे. मराठवाड्यातील सुशिक्षित पदवीधरांनी लोकशाहीवर अढळ निष्ठा दाखवत ही निवडणूक स्वतःच्या हातात घेतली होती. विरोधकांची संस्थात्मक ताकद आणि यंत्रणा असूनही महाविकास आघाडीची एकजूट, सकारात्मक विकासाचा जाहीरनामा आणि जमिनीवरील अचूक नियोजनामुळेच हा ऐतिहासिक कौल मिळाला आहे,” असा ठाम…

Read Full News

प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणी ठाणे पोलिसांची मोठी माहिती:आतापर्यंत 5 आरोपींना अटक; कायदा हातात घेणाऱ्यांनाही कारवाईचा इशारा

ठाण्याचे शिवसेना ठाकरे गटाचे नेते प्रदीप पूर्णेकर यांची गेल्या महिन्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पूर्णेकरांच्या हत्येनंतर ठाण्यात चांगलेच वातावरण तापले आहे. शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. तर शिंदे गटाने देखील याला पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले. त्यानंतर आज ठाणे पोलिसांनी पत्रकार…

Read Full News

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आमदार जगताप यांचा मदतीचा हात:मुख्यमंत्री सहायता निधीत 11 लाखांचा धनादेश सुपूर्द

राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीचे नुकसान आणि आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडे ११ लाख रुपयांची मदत सुपूर्द करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या मदतीचा धनादेश देण्यात आला. पावसाने दडी मारल्याने राज्यातील अनेक भागांमध्ये शेती आणि शेतकरी आर्थिक संकटात…

Read Full News

नोएल टाटा 6 मोठ्या कंपन्यांच्या बोर्डावरून पायउतार होणार:12 नोव्हेंबरला 70 वर्षांचे होतील, निवृत्ती धोरणानुसार निर्णय; टाटा सन्सच्या बोर्डावर राहणार

टाटा ट्रस्ट्सचे अध्यक्ष नोएल टाटा 12 नोव्हेंबर रोजी 70 वर्षांचे होणार आहेत. बिगर-कार्यकारी संचालकांसाठी टाटा समूहाच्या निवृत्ती धोरणानुसार ते समूहातील 6 प्रमुख कंपन्यांच्या संचालक मंडळाचा राजीनामा देतील. मात्र, ते टाटा सन्सच्या संचालक मंडळावर टाटा ट्रस्ट्सचे नामनिर्देशित संचालक म्हणून कायम राहतील. टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांची फेरनियुक्ती, टाटा सन्सचे सूचिबद्धीकरण आणि समूहाच्या प्रशासन नियमांवरून मतभेद…

Read Full News

वृक्षतोडीवरून मनोज जरांगे आक्रमक:पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम रद्द करण्याची केली मागणी; स्थानिकांना एकजूट राहण्याचे आवाहन

पाली आणि सह्याद्री परिसरातील डोंगर आणि वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. निसर्गावरील हा घाव थांबवण्यासाठी येत्या 3 तारखेला होणाऱ्या पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाचे उद्घाटन रद्द करण्याची थेट मागणी जरांगे यांनी केली आहे. सरकारने स्थानिकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केल्यास सावध राहावे, असा सल्ला देत त्यांनी स्थानिकांना एकजूट राहण्याचे आवाहन केले आहे….

Read Full News

कुराशच्या बनावट प्रमाणपत्रप्रकरणी 25 जणांना अटक:यात 14 पोलिसांचा समावेश, 19 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

कुराश खेळाची बनावट प्रमाणपत्रे सादर करून सरकारी नोकरी मिळवल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आतापर्यंत 25 जणांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये 14 पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश असून, काही आरोपींना येरवडा कारागृहात पाठवण्यात आले आहे.तर 19 पोलिस कर्मचाऱ्यांवर याप्रकरणी गुन्हा दाखल असून त्यापैकी पाच पोलिस कर्मचारी गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेच्या भीतीने पसार झाले आहेत. खेळाच्या प्रमाणपत्रांच्या आधारे…

Read Full News

गुरुग्राममध्ये महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरला कारमध्ये कोंडले:म्हणाल्या- कॅब चालकाने जीवे मारण्याची धमकी दिली; जास्त भाडे मागितले

हरियाणातील गुरुग्राममध्ये उबर कॅबच्या चालकावर महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरशी गैरवर्तन करून तिला कारमध्ये कोंडून ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. इंजिनिअरचा आरोप आहे की, चालकाने ठरलेल्या भाड्यापेक्षा जास्त पैसे मागितले आणि तिच्याशी असभ्य वर्तन केले. पीडित तनीषाच्या म्हणण्यानुसार, तिने दिल्ली विमानतळावरून गुरुग्रामला जाण्यासाठी उबर ॲपवरून कॅब बुक केली होती. ॲपवर भाडे सुमारे 625 रुपये दाखवले होते, मात्र…

Read Full News

सेको इंडिया पुण्यातील उत्पादन क्षमता वाढवणार, रोजगार वाढणार:भारतात 30 वर्षे पूर्ण, युरोपबाहेरचे सर्वात मोठे युनिट ठरणार

धातू कापण्याशी संबंधित तंत्रज्ञान आणि साधने पुरवणाऱ्या स्वीडिश सेको कंपनीने भारतातील कार्याला 30 वर्षे पूर्ण केली आहेत. या निमित्ताने कंपनीने युरोप नंतर सर्वात मोठे युनिट म्हणून पुण्यातील उत्पादन कामकाजाचा विस्तार आणि भविष्यातील मागणी पूर्ण करण्यासाठी क्षमता अधिक बळकट करण्याची दिशा जाहीर केली त्यामुळे रोजगाराला चालना मिळणार असल्याचे मत सेकोचे अध्यक्ष स्टेफन स्टीनस्ट्रप यांनी व्यक्त केले…

Read Full News