Headlines

मेहूणबारे:मेहुणबारे येथे मध्यरात्री सहा बंद घरांमध्ये चोरी

चाळीसगाव तालुक्यातील मेहूणबारे गावात चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच रात्री तब्बल ६ बंद घरे फोडल्याची धक्कादायक घटना गुरुवारी मध्यरात्री उघडकीस आली. चोरट्यांनी कडी-कोयंडा तोडून घरातील ६१ हजार ६०० रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांसह इतर घरांमधून ऐवज लांबवला आहे. येथील रहिवासी निर्मला यशवंत महाजन (वय ४८) यांच्या बंद घराचा कडी-कोयंडा मध्यरात्री १.३० ते सकाळी ७.४५ वाजेच्या सुमारास अज्ञात…

Read More

ट्रकला धडकलेल्या कारचा चक्काचूर, 3 जणांचा मृत्यू:चालकासह 8 जण जखमी, नागपूरला रेफर; नागपूरहून कुबेरेश्वर धामला जात होते

मध्यप्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील मुलताई फोरलेनवर जीतू ढाब्याजवळ एका भरधाव कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की कारचा चक्काचूर झाला. घटनास्थळी पती-पत्नीसह तीन जणांचा मृत्यू झाला, तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी पहाटे 3:30 वाजता झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, कारमधील सर्वजण भाविक होते,…

Read More

दिवाळी सणात समृद्धी महामार्गावरून संभाजीनगर ते ठाणे धावणार एसटी:भाडेही लवकरच निश्चित होणार, प्रायोगिक तत्त्वावर बससेवा सुरू करणार

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (एसटी) समृद्धी महामार्गावर बससेवा सुरू करण्याची तयारी सुरू झाली आहे. छत्रपती संभाजीनगर ते ठाणे या मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर एक एसटी बस सुरू करण्यात येणार आहे. दिवाळीच्या सुट्यांमध्ये या मार्गावर प्रवाशांची संख्या वाढत असल्याने एसटीने हा निर्णय घेतला आहे. छत्रपती संभाजीनगरहून ठाण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना सध्या विविध…

Read More

खंडाळा:जीवाला जीव देणारा नव्हे तर जीवनासाठी दिशा देणारा मित्र बनवा : इंदुरीकर महाराज

आजची मुले म्हणतात हा माझा जिगरी मित्र आहे, जीवाला जीव देणारा आहे. अरे, जीवाला जीव देऊन काय उपयोग? जर तुझं जीवनच वाया जात असेल तर अशा मैत्रीचा काय फायदा? मित्र असा बनवा जो तुम्हाला दारू, गुटखा या वाईट सवयींतून बाहेर काढेल. जो व्यसनाकडे नाही तर शिक्षणाकडे नेईल. जो म्हणेल अरे अभ्यास कर आणि आई-बापाचं नाव…

Read More

महामार्गावरील अपघातामध्ये गंभीर जखमी व्यक्तीचा मृत्यू:कन्नड रुग्णालयावर नातेवाइकांचा तीव्र संताप‎

सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर कन्नड शहरालगत रिलायन्स पेट्रोल पंपाजवळील अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा कन्नड ग्रामीण रुग्णालयाच्या कारभारामुळे, वेळेवर रुग्णवाहिका व ऑक्सिजन न मिळाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. गारगोटी (ता. कन्नड) येथील सुभाष मूलचंद राठोड (४०) हे दुचाकीने (एमएच २० ईडब्ल्यू ७२७१) छत्रपती संभाजीनगरकडून कन्नडकडे येत असताना एका ट्रकने अचानक वळण घेतल्याने अपघात…

Read More

पंजाबमध्ये 10 दिवसांत ₹20 ने साखरेचे दर वाढले:3 लाख टनने उत्पादन घटले, इथेनॉल उत्पादनही मोठे कारण; मिठाई आणखी महाग होणार

पंजाबमध्ये सणासुदीच्या हंगामाच्या अगदी आधी साखरेने महागाईचा धक्का दिला आहे. 10 दिवसांच्या आत साखरेचे दर 20 रुपयांपर्यंत वाढले. जालंधरमध्ये दर 45 रुपये प्रति किलोवरून थेट 65 रुपये झाले. तर, लुधियाना, मोहालीसह इतर ठिकाणी 15 रुपयांपर्यंत वाढ दिसून आली. आशियातील मोठ्या किराणा बाजारांपैकी एक असलेल्या फेंटनगंज जालंधरमधील साखर घाऊक विक्रेता गोपाल यांनी सांगितले की, केंद्र सरकारने…

Read More

पैठणला आरोग्य विभाग:100 खाटांचे नवीन उपजिल्हा रुग्णालय उभारणार; नाशिक कुंभमेळा: आरोग्य सेवा आयुक्तालयाकडे सर्वसमावेशक आराखडा सादर‎

नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याला येणारे भाविक पैठण येथेही संत एकनाथ महाराजांच्या दर्शनासाठी येणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी पैठण येथे १०० खाटांचे नवीन उपजिल्हा रुग्णालय स्थापन करण्यात येणार आहे. हे उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्याचा प्रस्ताव मे २०२५ मध्ये देण्यात आला होता. विशेष म्हणजे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे पैठण येथील ३० खाटांच्या हॉस्पिटलमधील खाटांची संख्या…

Read More

एक्सपोज:अठरा कोटींचे रुग्णालय दोन वर्षांपासून धूळखात, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या दौऱ्याकडे लक्ष

विभागीय संदर्भ रुग्णालयाच्या आवारातच १८ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेले १०५ खाटांचे अद्ययावत रुग्णालय गेल्या दोन वर्षांपासून धूळखात पडून आहे. इमारत पूर्णत्वाचा दाखला घेताना याठिकाणी आवश्यक फायर सेफ्टीची स्वतंत्र पाण्याची टाकीच बांधण्यात आली नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. त्यानंतर दोन वर्ष उलटून गेली तरी ती इमारत रुग्णांसाठी सुरू झालेली नाही. नाशिकच्या दौऱ्यावर असलेले आरोग्यमंत्री प्रकाश…

Read More

विकासाला गती:लासलगावसह 5 गावांना एकत्र करत नगरपरिषद निर्मितीचा प्रयत्न

लासलगाव, टाकळी विंचूर, पिंपळगाव नजीक, ब्राह्मणगाव व निमगाव वाकडा ही गावे एकत्र करून लासलगाव नगरपरिषद निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नगरपरिषद झाल्यास मोठी शासकीय यंत्रणा उपलब्ध होण्याबरोबरच विविध योजनांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी मिळून लासलगाव व परिसराच्या विकासाला अधिक गती मिळेल, असे प्रतिपादन मंत्री छगन भुजबळ यांनी केले. लासलगाव येथे विविध विकासकामांच्या लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रमात…

Read More

साक्री-शिर्डी महामार्गावर ढोलबारे शिवारातील अपघातात एक ठार:सूचना फलकांचा अभाव‎

सटाणा साक्री-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर ढोलबारे शिवारातील गंगाई पेट्रोल पंपाजवळ कांदा चाळीसमोर कार आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार संजय छगन चौधरी (३६, रा. कुडाशी) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गुरुवारी (दि. २०) मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, कार सटाण्याकडून ताहाराबादकडे जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक झाली. अपघाताची तीव्रता इतकी होती की, दुचाकीस्वार काही अंतरापर्यंत फरपटत…

Read More