भातकुली पंचायत समितीत पीओपी जमीनदोस्त:कामकाजही प्रभावित, कर्मचाऱ्यांच्या जीवावर बेतण्यापूर्वी दुरुस्तीची मागणी
भातकुली पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील पीओपी अचानक जमीनदोस्त झाल्याने तेथील कामकाज प्रभावित झाले आहे. पीओपी ज्यावेळी पडले, त्यावेळी सुदैवाने कुणी कर्मचारी तेथे नव्हते, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. परंतु एकूणच इमारत नादुरुस्त झाल्याने त्वरेने दुरुस्तीकार्य हाती घ्यावे, अशी मागणी कर्मचारी संघटनेने केली आहे. जिल्हा परिषदेचे सीईओ सत्यम गांधी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुळकर्णी, बांधकाम विभागाच्या कार्यकारी…