Headlines

गुजरातमध्ये 200 लोकांना अन्नातून विषबाधा:59 जणांना रुग्णालयात दाखल केले, लग्नात आंब्याचा रस प्यायल्यानंतर बिघडली तब्येत

गुजरातच्या दाहोद जिल्ह्यात लग्नादरम्यान अन्न विषबाधेमुळे (फूड पॉइझनिंग) 200 हून अधिक लोक आजारी पडले. त्यापैकी 59 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना सोमवार रात्रीची आहे. लग्नात 400 हून अधिक लोक उपस्थित होते. रात्री 8 वाजण्याच्या सुमारास जेवण सुरू झाले. काही लोकांच्या मते, आंब्याचा रस प्यायल्यानंतर तब्येत बिघडायला लागली. आजारी लोकांना तात्काळ जवळच्या सरकारी आणि…

Read More

महिला शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय!:आता मिळणार स्वतंत्र ‘शेतकरी’ दर्जा; फडणवीस सरकार आणणार नवा कायदा

महाराष्ट्रातील लाखो महिला शेतकऱ्यांसाठी एक ऐतिहासिक आणि दिलासादायक निर्णय घेण्याच्या तयारीत राज्य सरकार आहे. शेतीत प्रत्यक्ष राबणाऱ्या, पण जमिनीची मालकी नसल्यामुळे अनेक सरकारी योजनांपासून वंचित राहणाऱ्या महिलांना आता स्वतंत्र ‘शेतकरी’ म्हणून वैधानिक मान्यता मिळणार आहे. यासाठी राज्य सरकार ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026’ पावसाळी अधिवेशनात सादर करण्याची तयारी करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

Read More

पुणे–बंगळुरू महामार्गावर मध्यरात्री गोळीबार:कालगावच्या सरपंचाकडून व्यावसायिकावर हल्ला, पैशांच्या वादातून गोळ्या झाडल्याचा आरोप

पुणे–बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कराड शहराजवळील इंदोली फाटा परिसरात शनिवारी मध्यरात्री झालेल्या थरारक गोळीबारामुळे कराड तालुक्यासह संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. व्यावसायिक व्यवहारातील पैशांच्या हिशोबावरून झालेल्या वादातून कालगावचे सरपंच सोमनाथ चव्हाण यांनी संतोष घोलप यांच्यावर गोळीबार केल्याचा आरोप असून, या हल्ल्यात घोलप गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कराड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक…

Read More

शिंदेसेनेकडून बाजोरीया यांचा पत्ता कट:अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सईद खान याच्या नावाची घोषणा, महायुतीत धुसफुसीची चिन्हे

परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्या. शिंदेसेनेतून उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार असलेल्या माजी आमदार विप्लव बाजोरीया यांचा पत्ता कट होऊन शिंदेसेनेचे अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांची उमेदवारी जाहिर झाली आहे. त्यामुळे आता महायुतीत मतदानावरून धुसफूस होण्याची चिन्हे दिसून लागली आहेत. परभणी- हिंगोली विधान परिषदेची जागा महायुतीमध्ये शिंदेसेनेने सोडवून…

Read More

आगामी 4 दिवस महाराष्ट्रात पाऊस:बंगालचा उपसागर, अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण, राज्यातील 6 जिल्ह्यांना रेड, 10 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

महाराष्ट्रात 16 दिवसांच्या खंडानंतर परतलेला मान्सून जोरदार कोसळत आहे. मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर वरुणराजाने रौद्ररूप धारण केले आहे. मुंबईत शनिवारी 6 तासांतच 164 मिमी पाऊस झाला. मुंबईत 64 ठिकाणी झाडे, तर 9 ठिकाणी भिंत कोसळली. सुदैवाने जीवितहानी टळली. वसईतील मधुबन टाऊनशिप येथे शाळेला पुराने वेढले. त्यामुळे शाळेत 41 शिक्षक अडकले होते. त्यांना आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन…

Read More

दिल्ली हायकोर्टात व्हर्च्युअल सुनावणीत अश्लील व्हिडिओ चालला:स्क्रीनवर हॅकचा संदेश दिसला; गाणीही वाजली, मुख्य न्यायमूर्तींनी सुनावणी थांबवली

दिल्ली उच्च न्यायालयात बुधवारी व्हर्च्युअल सुनावणीदरम्यान अश्लील व्हिडिओ सुरू झाला. त्यावेळी मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस खरिया यांचे खंडपीठ सुनावणी करत होते. ही घटना दुपारी १२:५६ वाजताची आहे. घटनेच्या वेळी खंडपीठ कोणत्या प्रकरणाची सुनावणी करत होते, हे स्पष्ट झाले नाही. पॉर्न व्हिडिओ सुरू होताच, तात्काळ सुनावणी थांबवण्यात आली. काही मिनिटांनंतर सुनावणी पुन्हा…

Read More

आरक्षणाची सवलत घेणाऱ्यांना आता खुल्या प्रवर्गाचे दरवाजे बंद:महाराष्ट्र सरकारकडून आरक्षणाचे नवीन धोरण जाहीर; भरती प्रक्रियेत होणार बदल

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारी नोकरीतील आरक्षणासंदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, ज्या उमेदवारांनी आरक्षणाची सवलत घेतली आहे, त्यांना आता खुल्या प्रवर्गातील जागांवर दावा सांगता येणार नाही. केंद्र सरकार आणि गुजरात राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही हे आरक्षणाचे नवे धोरण निश्चित केले असून, या निर्णयामुळे राज्य सरकारी नोकरभरतीच्या प्रक्रियेत मोठे बदल होणार आहेत. राज्य सरकारने…

Read More

वेरूळ घाटात बिबट्याचे दर्शन; प्रवाशांमध्ये भीती:नागरिकांना वन विभागातर्फे खबरदारीचा इशारा‎

खुलताबाद-वेरूळ परिसरात सध्या बिबट्याच्या वावरामुळे नागरिक, भाविक आणि पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गुरुवारी रात्री शहरालगतच्या शंजरी हॉटेलजवळ म्हणजेच वेरूळ घाटाच्या सुरुवातीलाच एका बिबट्याचे दर्शन झाले. वनविभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. वेरूळ लेणी, बारावे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर मंदिर, सुलिभंजनचा दत्त डोंगर आणि थंड हवेचे ठिकाण म्हैसमाळ येथे दररोज हजारो पर्यटक आणि भाविक येत…

Read More

Maharashtra Heatwave SOPs Issued; 15 High-Risk Districts Under Focus

राज्यात वाढत्या तापमानाचा पारा ४७ ते ५० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचत असताना, नागरिकांच्या आणि विशेषतः ऊन-वारा अंगावर सोसणाऱ्या घटकांच्या संरक्षणासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. राज्य उष्णता कृती आराखडा आणि भारतीय हवामान विभागाच्या (IMD) सतर्कतेन . आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी या एसओपींची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये…

Read More

CBSE OSM controversy, 4 out of every 10 students who asked for answer sheets demanded paper verification, maximum applications came for Physics

Marathi News National CBSE OSM Controversy, 4 Out Of Every 10 Students Who Asked For Answer Sheets Demanded Paper Verification, Maximum Applications Came For Physics नवी दिल्ली8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सीबीएसई ऑन स्क्रीन मार्किंग (ओएसएम) वादाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता १२ वीची परीक्षा देणाऱ्या दर चौथ्या विद्यार्थ्याने आपली उत्तरपत्रिका मागितली होती. आता पुढच्या टप्प्यात दर १० पैकी…

Read More