Headlines

बोगस पत्रकारांवर‎ कडक कारवाई करा‎:नेवासे प्रेस क्लबचे प्रताप दराडे यांना निवेदन

नेवासे तालुक्यात वाहनांवर व इतरत्र ‘प्रेस’ नाव टाकून पत्रकार पदाचा गैरवापर करणाऱ्या आणि शासकीय कर्मचाऱ्यांना ब्लॅकमेल करणाऱ्या तोतया पत्रकारांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नेवासा प्रेस क्लबच्या वतीने पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात नमूद केले आहे की, तालुक्यात लोकशाहीचा चौथा स्तंभ बदनाम करणाऱ्या बोगस पत्रकारांचा मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट झाला…

Read More

पेपरफुटीतील दोषींना सोडणार नाही:मात्र विद्यार्थ्यांच्या मागण्या धोरणात्मक असाव्यात'; रामदास आठवलेंनी करून दिली 'पँथर'च्या काळातील आठवण

दिल्लीतील जंतरमंतरवर ‘नीट’ पेपरफुटी आणि इतर शिक्षणविषयक प्रश्नांवरून सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ‘X’ (ट्विटर) वरून आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. पेपरफुटीतील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन देतानाच, त्यांनी आंदोलक विद्यार्थ्यांना ‘पँथर’च्या काळातील आंदोलनांची आठवण करून देत शांततेचे आणि धोरणात्मक मागण्यांचे आवाहन केले…

Read More

सरकारवर टीका करणे म्हणजे देशद्रोह नाही:मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या महादेव बालगुडेंना जामीन; पिंपरी कोर्टाचा मोठा निर्णय

पिंपरी-चिंचवड येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. डी. कुलकर्णी यांनी महादेव विलास बालगुडे यांना नियमित जामीन मंजूर केला आहे. बालगुडे यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप होता. पिंपरी-चिंचवड सायबर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. बालगुडे यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 152 सह विविध कलमांखाली गुन्हा दाखल त्यावेळी…

Read More

एनसीएमसी कार्डसाठी वयोवृद्धांची परवड, पैसे भरुनही कार्डसाठी चकरा:ऑगस्टपासून सवलत बंदची भीती; कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे‎

‘मार्च महिन्यात एनसीएमसी कार्ड काढले होते, परंतू आता १३ जुलै येऊनही एनसीएमसी कार्ड मिळाले नाही’, तीन महिन्यांपासून चकरा मारतोय मात्र एसटी प्रशासनाकडून याबाबत काहीच सांगितले जात नाही. २०० रुपये देऊनही कार्ड नाही, अशी व्यथा येथील बसस्थानक क्रमांक-१ मध् . यातील कुणी शहरातील तर बहुतांश ग्रामीण भागातील ज्येष्ठ होते. वाडेगाव, आलेगाव, कापशी आदी गावांमधून ग्रामस्थ एनसीएमसी…

Read More

कर्जत-जामखेडचा वीज प्रश्न मार्गी लावा:सायंकाळी 6 ते 10 दरम्यान अखंडित वीज द्या, सभापती राम शिंदे यांचे महावितरणला निर्देश

कर्जत-जामखेड तालुक्यातील नागरिकांना अखंडित व सुरळीत वीज पुरवठा मिळावा यासाठी तातडीने परिणामकारक उपाययोजना अंमलात आणाव्यात, असे निर्देश विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी वीज वितरण कंपनीला दिले. शासकीय विश्रामगृहात वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत तालुक्यातील वीज पुरवठ्याबाबत आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस अधीक्षक अभियंता रमेश पवार, कार्यकारी अभियंता कौस्तुभ डबीर, उपकार्यकारी अभियंता प्रवीण…

Read More

दिल्ली ACP विवेक भगत यांना अतिरिक्त-DCP पदाचा पदभार देण्यास स्थगिती:महिला पत्रकाराशी गैरवर्तन केल्याचा ठपका; सरकार म्हणाले- ही पदोन्नती नाही

दिल्ली सरकारने ACP विवेक भगत यांना अतिरिक्त DCP पदाचा कार्यभार देण्याला स्थगिती दिली आहे. भगत यांच्यावर 3 ऑक्टोबर रोजी जंतर-मंतर येथे आंदोलनात एका महिला पत्रकाराचा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. त्यांच्याविरोधात FIR दाखल करण्याच्या मागणीसाठी गेल्या 3 दिवसांपासून पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन सुरू आहे. सरकारच्या माहितीनुसार, केंद्रशासित प्रदेशांतील 12 अधिकाऱ्यांना अतिरिक्त DCP चा करंट…

Read More

कसब्याच्या विजयात चर्चा ‘मानकर पॅटर्न’ची – MahaPlus.in is a Marathi Info News Portal | Latest News about Politics, Education, Crime, Entertainment and many more

राजकीय कसबा विधानसभा निवडणुकीत रवींद्र धंगेकर यांच्या टिकेने ऍक्टिव्ह झालेल्या मानकर समर्थकांनी रासनेंच्या प्रचारासाठी विशेष मोहीम राबविली. Editor Nov 23, 2024 – 21:00 Updated: Nov 23, 2024 – 21:01 Mankar Pattern in Kasba Election पुणे: कसबा विधानसभा मतदार संघाच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांचा पराभव करून हेमंत रासने यांनी १९ हजारांचे मताधिक्य घेत विजय मिळवला. यानंतर कसब्यात मानकर समर्थकांनी केलेल्या प्रचाराची…

Read More

बळेवाडीत एआय माध्यमातून ऊस उत्पादन शेती कार्यशाळा:ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांचे मार्गदर्शन‎

बळेवाडी (ता. बार्शी) येथील श्री स्वामी समर्थ मंदिर नमो नैसर्गिक व आत्मनिर्भर कृषी व ग्राम विकास प्रबोधिनी येथे गुरुवारी (दि. १४) विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ शास्त्रज्ञ भारत कृषीरत्न डॉ. विजय भटकर यांच्या ऑनलाईन मार्गदर्शनाखाली, अवघ्या २०० रुपये वार्षिक खर्चात ए.आय. (AI) टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून १०० टन ऊस उत्पादन व नैसर्गिक शेती या विषयावर…

Read More

महिला तुरुंगाधिकाऱ्याने माजी कैदी असलेल्या तरुणाशी केले लग्न:कारागृहात झाले प्रेम, जन्मठेपेनंतर सुटका; नप उपाध्यक्षाला मारून जमिनीत गाडले होते

सतना सेंट्रल जेलच्या सहायक अधीक्षक फिरोजा खातून यांनी खुनाच्या प्रकरणात शिक्षा भोगलेल्या धर्मेंद्र (अभिलाष) नावाच्या तरुणाशी हिंदू रितीरिवाजानुसार लग्न केले. 5 मे रोजी छतरपूर जिल्ह्यातील लवकुश नगर येथे झालेल्या या लग्नाची संपूर्ण परिसरात चर्चा आहे. अभिलाषने जन्मठेपेची शिक्षा भोगली आहे. सुमारे 4 वर्षांपूर्वी तो तुरुंगातून सुटला होता. फिरोजाचे मुस्लिम कुटुंबीय या नात्यावर नाराज होते. ते…

Read More

मराठा आरक्षणावर समाधानकारक काम:राधाकृष्ण विखे पाटील यांचा दावा; जिल्हाधिकाऱ्यांना तालुका पातळीवरील सॅम्पल केसेस शोधण्याचे निर्देश

राज्याचे जलसंपदा मंत्री तथा मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज मराठा आरक्षणाच्या मुद्यावर समाधानकारक काम झाल्याचा दावा केला. मराठा आरक्षणाच्या बाबतीत मिसिंग लिंक शोधण्याच्या बाबतीत अनेक ठिकाणी समाधानकारक काम केले आहे. पण या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्याला जाऊन सॅम्पल केसेसचा आढावा घेतला पाहिजे. वस्तुस्थिती काय आहे? हे समजून घेतले पाहिजे. ग्राऊंड रिपोर्ट काय…

Read More