उभी पिके करपू लागली; शेतकऱ्यांच्या चांगल्या पिकाच्या आशेवर फिरले पाणी:जमिनीला भेगा, कपाशी-सोयाबीनची वाढ खुंटली
पावसाळ्याचा हंगाम सुरू होऊनही गेल्या ३२ दिवसांपासून पावसाने पूर्णपणे दडी मारल्याने मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट उभे ठाकले आहे. सुरुवातीला झालेल्या समाधानकारक पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने खरिपाच्या पेरण्या पूर्ण केल्य . पेरणी झाली; मात्र पावसाने साथ सोडली : यंदा हंगामाच्या सुरुवातीला कपाशी, सोयाबीन, तूर, मूग, उडीद आदी पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली. जमिनीत…